WhatsApp : 'हे' लोकप्रिय फीचर बंद करण्याचा निर्णय

belgavkar.com | belgaum | belgavkar

WhatsApp removes messenger rooms shortcut feature

व्हॉट्सअ‍ॅप कायम नवनवीन फीचर आणत असतं. अ‍ॅप अधिकाधिक करण्याचा प्रयत्न WhatsApp कडून सातत्यानं सुरू असतो. कंपनीनं नुकतंच मल्टी डिव्हाईस सपोर्ट नॉन बिटा यूजर्ससाठी उपलब्ध करून दिलं. मात्र WABetaInfoनं दिलेल्या वृत्तानुसार, व्हॉट्सअ‍ॅपनं एक लोकप्रिय फीचर हटवलं आहे. वर्षभरापूर्वी कंपनीनं हे फीचर सुरू केलं होतं. वर्षभरापूर्वी व्हॉट्स अ‍ॅपनं मेसेंजर रुम तयार करण्यासाठी एक उपयोगी शॉर्टकर्ट उपलब्ध करून दिला.
त्यामुळे 50 जणांना फेसबुकवर ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी होता यायचं. मात्र आता हा पर्याय हटवून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चॅट शेअर शीटमधूनही हा पर्याय डिलीट करण्यात येत आहे. एँड्रॉईड आणि आयओएसच्या व्हॉट्सअ‍ॅप बिटावरील कॉल सेक्शनमधूनही पर्याय हटवण्यात येणार आहे. या फीचरमुळे व्हॉट्सअ‍ॅपचे अँड्रॉईड वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एक रूम तयार करू शकतात आणि त्यामध्ये सहभागी होऊ शकतात.
WABetaInfoनं दिलेल्या वृत्तानुसार, या फीचरचा जास्त वापर होत नसल्यानं व्हॉट्सअ‍ॅपनं ते हटवण्याचा निर्णय घेतला. 'वापरकर्ते कोणत्या फीचरचा वापर करतात त्याचा तपशील व्हॉट्सअ‍ॅपकडून वेळोवेळी पाहिला जातो. एखादं फीचर यशस्वी होत नसेल तर त्यात बदल केले जातात. या फीचरचा जास्त वापर होत असल्याचं लक्षात आल्यानं ते हटवलं गेलं असावं. पुढील अपडेटमध्ये त्यासाठी चांगलं रिप्लेसमेंट मिळू शकतं,' असं WABetaInfoनं वृत्तात म्हटलं आहे. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

WhatsApp : 'हे' लोकप्रिय फीचर बंद करण्याचा निर्णय
WhatsApp removes messenger rooms shortcut feature

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm