बेळगाव : मध्यरात्रीनंतर रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात 6 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. मुतगा गावातील नरसू रायप्पा कुंपी आणि त्याच गावातील सात लोकांच्या सुमारे 400 मेंढ्या शिवबसवनगर येथील कन्नड शाळेच्या आवारात ठेवण्यात आल्या होत्या. मध्यरात्री 20 पेक्षा जास्त कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे सहा मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तीन मेंढ्या गंभीर जखमी झाल्याची माहिती उपलब्ध आहे. रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुमारे 60,000 रुपयांचे नुकसान झाले आहे.