shradha-mavarkar-gokak-girl-dead-hospital-belgaum-news.jpg | डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप | belgaum news | belgavkar बेळगावकर

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप जीवनमुखी फौंडेशनने केला आहे. श्रध्दा परशुराम मावरकर (वय 9, रा. गोकाक तालुका) असे तिचे नाव आहे. मुलगी टॉन्सिल आजाराने ग्रस्त होती. तिला 20 डिसेंबर 2019 रोजी शस्त्रक्रिया उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. शस्त्रक्रियेसाठी तिला दाखल करेपर्यंत तिची प्रकृती व्यवस्थित होती. मात्र शस्त्रचिकित्सा झाल्यानंतर तिची प्रकृती खालावली.
मुलीला शस्त्रक्रियेच्यावेळी अधिक भूल दिल्याने तिची प्रकृती खालावली व दोन दिवस तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. तिच्यावर योग्य पध्दतीने उपचार झाले नसल्यामुळ अखेरच्या क्षणी बाजूच्याच केएलई रुग्णालयात नेण्याचा सल्ला न देता शेकडो किलोमीटर लांब असलेल्या हुबळी येथील नामांकित खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. यादरम्यान, सोमवारी (ता. 23 डिसेंबर) रात्री उशिरा तिचा मृत्यू झाल्याचा आरोप जीवनमुखी फौंडेशनचे प्रमुख किरणकुमार पाटील यांनी केला आहे.
या विरोधात फौंडेशनच्या प्रतिनिधींनी आज शुक्रवारी (24 जानेवारी) कन्नड भवन येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुलीच्या मृत्यूला सर्जन, बिम्सचे डॉक्टर आणि भूलतज्ज्ञ जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी फौंडेशनने केली असून एक महिना झाला तरी याप्रकरणाची दाखल घेतली जात नसल्यामुळे उद्या जिल्हा रुग्णालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. याप्रकरणाची चौकशी करुन श्रद्धाला न्याय देण्यात यावा, अशी मागणीही झाली.