belgaum-triple-murder-case-arrested-four-persons-202001.jpg | बेळगाव : ट्रिपल मर्डर प्रकरणी चारही आरोपींना अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : ट्रिपल मर्डर प्रकरणी चारही आरोपींना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील दोडवाड गावात झालेल्या तिहेरी हत्येप्रकरणी बेळगाव पोलिसांनी आज चारही संशयित आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवाप्पा बसाप्पा भगवंतण्णावर (वय 32 रा. लोकूर, ता. धारवाड), गोविंद शिवपुत्राप्पा संगोळ्ळी (वय 50), बसवंत अंबाण्णा अंदानशेट्टी (वय 38), मल्लिकार्जुन अंबाण्णा अंदानशेट्टी (वय 35) तिघेही राहणार दोडवाड यांना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. 12 एकर जमीन वादातुन ही हत्या झाल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी, बैलहोंगलचे एएसपी प्रदीप गुंटी, गुन्हे तपास विभागाचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. मालमत्तेच्या वादातून भाच्यानेच मामा, मामी आणि त्यांच्या मुलाचा काटा काढल्याचे उघडकीस आले आहे.
murder-of-the-three-of-the-same-family-members-belgaum-news-20200119.jpg | बेळगाव : ट्रिपल मर्डर प्रकरणी चारही आरोपींना अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर
दोडवाड गावात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली होती. तालुका पंचायत माजी सदस्य शिवानंद अंदानशेट्टी (वय 60), पत्नी शांतव्वा (वय 40) व मुलगा विनोद (वय 26) हे तिघे घरात झोपेत असताना काही 4-5 अज्ञातांनी त्यांच्या घरात घुसुन आणि कोणालाही काही कळायच्या आधी त्या तिघांवर धारदार शस्त्राने व राॅडने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्यामुळे मृत कुटुंबीयांना स्वतःचा बचाव करता आला नाही. यात हल्यात त्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. मयत विनोद याचा 30 जानेवारी रोजी विवाह ठरला होता. पण, तो बोहल्यावर चढण्यापुर्वीच त्याचा निर्घुन खून झाला. तिहेरी हत्याकांड घडविणारा शिवाप्पा हा शिवानंद अंदानशेट्टीची पहिली पत्नी कस्तुरीच्या भावाचा मुलगा आहे.
murder-belgaum-bailhongal-taluka-three-family-members-belgavkar-20200117.jpg | बेळगाव : ट्रिपल मर्डर प्रकरणी चारही आरोपींना अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर
घटनेनंतर शिवानंदच्या भाऊबंदांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. घराशेजारच्या जागेच्या वादातून सतत यांच्यात भांडणे होतच होती. याच प्रकारातून हे हत्याकांड घडल्याचा संशय होता. मात्र, पोलिसांनी चौघा जणांना अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एकाच युवकाने अत्यंत थंड या तिघा जणांचा खून केला आहे व उर्वरित तिघांनी त्याला खुनासाठी प्रवृत्त केल्याचे उघड झाले आहे.
हत्येच्या दिवशी मुख्य आरोपी शिवप्पा व विनोद जेवण करून झोपी गेले. त्यानंतर एका ट्रॅक्टर-टेलरच्या लोखंडी रॉडने शिवाप्पाने पहिला विनोदाचा खून केला. बाजूच्याच खोलीत शिवानंद आणि त्याची दुसरी पत्नी शांतावा झोपले होते. त्यानंतर मामाला आवाज देऊन उठविले. मामा शिवानंद बाहेर येताच मामाच्या डोकीतही रॉडने वार केला. आवाजामुळे जागे झालेल्या मामी शांतव्वाच्या डोक्यातही वार केला.
शिवानंद आणि त्यांची पहिली पत्नी कस्तुरी यांना मूलबाळ नव्हते. कस्तुरी हि त्याच गावात राहत होती. मात्र, अपत्य नसल्याने त्यांनी आपल्या 12 एकर मालमत्तेला वारसदार म्हणून मोठी बहीण पारव्वा हिचा मुलगा शिवाप्पाला 15 वर्षांपूर्वी आपल्याकडे ठेवून घेऊन शिवप्पाला मुलगा म्हणून वाढविले होते.
सात वर्षांपूर्वी शिवानंदने धारवाड जिल्ह्यातील शांतव्वाशी दुसरे लग्न केले. या दुसऱ्या पत्नीला पहिल्या पतीपासून मुलगा विनोद व मुलगी विद्या अशी अपत्ये होती. शांतव्वाबरोबर लग्न झाल्यानंतर शिवानंद सर्व जमीन मृत मुलगा विनोद याच्याच नावावर करणार होता. दुसरीकडे शिवानंदची पहिली पत्नी कस्तुरी ही आपल्या भावाकडे राहात होती. खून करणारा शिवाप्पा हा कस्तुरीकडे राहात होता.जर सर्व 12 एकर जमीन विनोदच्या नावे झाली तर आपल्याला काही मिळणार नाही. त्यामुळे शिवानंद व त्याच्या कुटुंबीयांना संपविण्याचा निर्णय शिवाप्पा याने घेतला. त्यामुळे मालमत्ता मिळाली नसल्यामुळे द्वेषाने हत्या करण्याचा कट रचला.