belgaum-accident-youth-dead-nh4-kadoli-village-20200123.jpg | अपघातात कडोलीचा युवक ठार; एकजण गंभीर जखमी | belgaum news | belgavkar बेळगावकर
किरण यशवंत बजंत्री

अपघातात कडोलीचा युवक ठार; एकजण गंभीर जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : रोजच्याप्रमाणे आज सकाळी 7च्या सुमारास कामावर जात असताना पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील NH4 यमकनमर्डी जवळ दुचाकीच्या झालेल्या अपघातात कडोली गावाचा युवक ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. किरण यशवंत बजंत्री (वय 20, रा. कडोली) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर बंबरगा गावाचा युवक अशोक मॅगीरी (वय 23) गंभीर जखमी झाला आहे.
belgaum-accident-youth-dead-nh4-kadoli-village-belgaum-news-20200123.jpg | अपघातात कडोलीचा युवक ठार; एकजण गंभीर जखमी | belgaum news | belgavkar बेळगावकर
मिळालेल्या माहितीनुसार, किरण हा हत्तरगी टोलनाक्यावर कामावर आहे. आज सकाळी दुचाकीवरून (KA 22 EA 7374 )कामावर जात असताना समोरील ऊसाच्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघात झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. तर बंबरगा गावाचा एक युवक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. यमकनमर्डी पोलीस स्थानकात या घटनेची नेंद झाली आहे.