बेळगाव : कंग्राळी खुर्द गावात कडक लॉकडाऊन; Lockdown नियम व अटी लागू

बेळगाव : कंग्राळी खुर्द गावात कडक लॉकडाऊन;
Lockdown नियम व अटी लागू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 11 मेपासून पुढील 6 दिवस ग्रामपंचायत कंग्राळी खुर्द हद्दीत कडक लॉकडाऊनचा निर्णय अधिकारी, सदस्य आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेतला. एपीएमसी पोलिस ठाण्याचे सीपीआयही यावेळी बैठकाला हजर होते. लॉकडाऊनच्या काळात भाजी आणि दूध घरपोच मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लाॅकडाऊन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी मार्केट यार्ड पोलिस स्टेशन व ग्रामपंचायत कंग्राळी खुर्द यांनी लादलेले नियम व अटी
11 मेपासुन 16 मेपर्यंत संपुर्ण कंग्राळी खुर्द गाव बंद. तसेच बाकीच्या दिवसांसाठी खालील नियम.
1) कंग्राळी खुर्द गावातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की कोणीही अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये.
2) गावामध्ये विना मास्क व कारण नसताना दुचाकी घेऊन किंवा चारचाकी घेऊन फिरल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
3) काही महत्वाचे काम असल्यास सकाळी 6 ते 9 या वेळेत करून घ्यावे.
4) मुख्य रस्त्यावर कोणीही भाजीपाला विकायला बसु नये. भाजीपाला विकायचा असल्यास एका ठिकाणी न बसता तो फिरून विकणे. एका ठिकाणी बसून विकल्यास 1000 दंड आकारण्यात येईल.
5) किराणी साहित्य सकाळी 6 ते 9 या कालावधीतच घ्यावे. दुकानाबाहेर कोणीही गर्दी करू नये. आपल्या साहीत्याची यादी दुकानदाराकडे देऊन नंतर साहीत्य घेऊन जाणे. यादी खाली आपला मोबाईल नंबर नमूद करणे.
6) कोणत्याही दुकानदाराने नियमाचे उल्लंघन करून साहित्याची विक्री केल्यास 5000 रुपये दंड ठोठावण्यात येईल.
7) 5 दिवस गावातील चिकन व मटण दुकान पूर्णपणे बंद राहतील. एखाद्या वेळी दुकान चालू केल्यास किंवा आतून बंद करून विक्री केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
8) सार्वजनिक ठिकाणी, शाळा, मंदिरे खुल्या जागेत किंवा गल्लीच्या कोपऱ्यावर (घोळका) एकत्र करून बसल्या 1000 दंड घेण्यात येईल
9) दूध विकणारे व शेतातील भाजीपाला भाजी मार्केटला घेऊन जाणारे यांना फक्त गावाबाहेर जाता येणार. वरील नियम मोडणाऱ्या संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. व पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल.._ .
Stay home stay safe
हुकुमावरून : ग्रामपंचायत कंग्राळी खुर्द व मार्केट यार्ड पोलिस स्टेशन

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कंग्राळी खुर्द गावात कडक लॉकडाऊन; Lockdown नियम व अटी लागू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm