कर्नाटक : झालेल्या दगडफेकीत बसचालकाचा मृत्यू

कर्नाटक : झालेल्या दगडफेकीत बसचालकाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : राज्य रस्ते वाहतूक महामंडळ आणि सरकारमधील संघर्षात जमखंडी येथील एका बसचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संपकाळात चालक कामावर हजर झाल्याने झालेल्या दगडफेकीत त्याचा मृत्यू झाल्याचे सरकारने म्हटले आहे. मृत्यू झालेल्या बसचालकाचे नाव रसूल अवटी (वय 59) असून ते जमखंडीहून विजापूरला बस घेऊन जात होते. जमखंडी तालुक्यातील कवटगीजवळ बस आली असता त्यांच्यावर जोरदार दगडफेक झाल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला.
चालक रसूल यांच्या मृत्यूला हल्ला करणारे कामगारच जबाबदार असल्याचे परिवहन व उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी म्हटले आहे. आंदोलन करणाऱ्या कामगारांनी आपला लढा शांततेने सुरू अल्याचा दावा केला असला तरी, त्यांचा हा दावा फोल आहे. त्यांनी आपल्या एका सहकाऱ्याचा जीव घेतला आहे. सरकार हे माफ करणार नाही. संपावर गेलेले कामगार इतर कामगारांना कर्तव्यावर परत येऊ देत नाहीत. त्यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे निष्ठावंत कामगारांना आपल्या कामावर हजर राहण्यापासून ते वंचित करीत आहेत, असे मंत्र्यांनी म्हटले आहे.
संपाचे नेतृत्व करणारे या घटनेला किंवा मंत्र्यांच्या आरोपाला प्रतिसाद देण्यात अपयशी ठरले. कर्नाटक राज्य रस्ता परिवहन कर्मचारी लीगचे प्रमुख नेते कोडीहळ्ळी चंद्रशेखर तसेच अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांनी वारंवार चौकशी करूनही पत्रकारांना प्रतिसाद दिला नाही. दुसऱ्या एका नेत्याने म्हटले आहे की, मृत्यूमुळे संघटनेला मोठा धक्का बसला आहे. लढा शांततेत सुरू राहील, याची खात्री देण्यात संघटनेचे नेते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे सरकारबरोबर वाटाघाटी करण्यात अडचण येईल. त्याचवेळी सेवेतून बडतर्फ झालेल्या शेकडो कामगारांचे भवितव्य आता बंद झाल्याचे दिसते आहे, असे सांगून संप मागे घेण्याची त्यांनी शक्यता वर्तविली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटक : झालेल्या दगडफेकीत बसचालकाचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm