कर्नाटक : यात्रा, सार्वजनिक धार्मिक समारंभांवर पूर्ण बंदी

कर्नाटक : यात्रा, सार्वजनिक धार्मिक समारंभांवर पूर्ण बंदी

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : कर्नाटक राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. याच पार्श्वूभूमीवर यात्रा, सार्वजनिकरीत्या होणाऱ्या धार्मिक समारंभांवर पूर्ण बंदी ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यापुढे जत्रा, महोत्सव होणार नाहीत. तसे झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. यापुढे समारंभात भाग घेण्यासाठी पास सक्तीचा राहील. लहान - मोठ्या सर्व यात्रांना सध्या बंदी घालण्याची स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे महसूलमंत्री आर. अशोक यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी व विविध जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शनिवारी (17 एप्रिल) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधल्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. मंत्री अशोक म्हणाले, एखाद्या कार्यक्रमासंदर्भात एक महिना आधीच स्पष्ट सूचना देण्यात याव्यात. सभागृहात 100 आणि बाहेरील विवाह सोहळ्यांमध्ये 200 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतल्याचे आढळून आल्यास मंगल कार्यालय बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला.
कोविड रुग्णांच्या उपचारादरम्यान ऑक्सिजनची कोणत्याही प्रकारे समस्या निर्माण होऊ नये. मागील वेळेच्या प्रकरणांपेक्षा यावेळी कोविडची प्रकरणे अधिक होऊ शकतात. यासंदर्भात डेटा नोंदीची समस्या निर्माण होणार नाही, यासाठी कारवाई केली जाईल.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटक : यात्रा, सार्वजनिक धार्मिक समारंभांवर पूर्ण बंदी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm