बेळगाव : शहापूरमध्ये गोंधळ तर 2 गावांचा मतदानावर बहिष्कार

बेळगाव : शहापूरमध्ये गोंधळ तर 2 गावांचा मतदानावर बहिष्कार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी सुमारे 55.61 टक्के मतदान झाले. कोरोनामुळे मतदानात 2019 च्या तुलनेत 12 टक्के घट झाली. भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. घटलेल्या मतदानाचा लाभ यापैकी कुणाला होणार हे 2 मे रोजी होणार्‍या मतमोजणीनंतरच कळेल. शहापूरमध्ये मतदान यंत्रच सुरू न होणे आणि रामदुर्ग तालुक्यात दोन गावांचा बहिष्कार अशा घटना वगळता इतरत्र मतदान सुरळीत झाले.
महत्त्वाचे म्हणजे कोरोना रुग्णांनाही मतदानाची मुभा होती. त्यांनी पीपीई किट घालून सायंकाळी मतदान केले. शहापूरमधील मतदान केंद्र क्रमांक 195 मधील मतदान यंत्र सकाळी 9 वाजेपर्यंत बंदच होते. त्यामुळे मतदान सुरूच झाले नाही. मतदारांनी तक्रार केल्यानंतर तांत्रिक दोष काढण्यात आला. रामदुर्ग तालुक्यातील दोन गावांनी लोकसभा पोटनिवडणुकीवर शनिवारी बहिष्कार घातला. त्यामुळे या दोन्ही गावांतील मतदान केंद्रांकडे दिवसभर मतदार फिरकले नाहीत. पूरग्रस्त गावांचे स्थलांतर करा, असा आग्रह धरून रामदुर्ग तालुक्यातील हिरेतडसी आणि चिक्कतडसी या दोन्ही गावांनी मतदानावर बहिष्कार घातला. मागणी पूर्ण होईपर्यंत मतदान करणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली.
दोन वर्षांपासून पूरग्रस्तांना शासनाने काहीही मदत केली नसल्याच्या निषेधार्थ आपण मतदानावर बहिष्कार घातल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दोन्ही गावामध्ये सुमारे अडीच हजार मतदार होते. यापूर्वी या दोन्ही गावांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते, पण त्याची दखल न घेण्यात आल्याने अखेर निवडणुकीवर बहिष्कार घातला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : शहापूरमध्ये गोंधळ तर 2 गावांचा मतदानावर बहिष्कार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm