बेळगाव : व्हायरल Voting व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल Video

बेळगाव : व्हायरल Voting व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल Video

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीत सिंह-समिती-शेळके आणि ईव्हीएम मशीनवरील 9 नंबरला मतदान केल्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञातावर मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक फिरत्या पथकातील अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. मतदानादरम्यान ईव्हीएम मशिन आणि व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी मार्केट पोलिस स्थानकात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
किल्ला येथील भरती स्कूलमध्ये मतदान करताना अज्ञातांनी ईव्हीएम मशिनचे बटन दाबताना तसेच चिन्ह, उमेदवाराचे नाव आणि क्रमांक या सर्वांचे व्हिडिओ व चित्रे करून ते सोशल मीडियावर काहींनी व्हायरल केले होते. निवडणूक अधिकारी उमेश बसवनेप्पा शीगीहल्ली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे.
मतदान करणे हे गुप्तता बाळगण्याची प्रक्रिया आहे. मात्र, मतदान करून याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. यावरून निवडणूक अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मार्केट पोलिस स्थानकात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केट पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी याचा अधिक तपास करत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : व्हायरल Voting व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल Video

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm