बेळगाव : कोरोना पॉझिटिव्ह जारकीहोळींनी पीपीई किट घालून केलं मतदान

बेळगाव : कोरोना पॉझिटिव्ह जारकीहोळींनी पीपीई किट घालून केलं मतदान

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : माजी मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी हे कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्यांचे द्वितीय पुत्र अमरनाथ जारकीहोळी यांना देखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे. केएमएफचे संचालक अमरनाथ जारकीहोळी यांना बेळगावात होत असलेल्या लोकसभा पोटनिवडणूक मतदानाच्या दिवशीच (शनिवार) गोकाकच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जगभरात थैमान घालणारा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात वाढत असतानाच, दुसरीकडे बेळगावात निडणुकीत पार पडत आहे.
आज, कोरोना पॉझिटिव्ह अमरनाथ जारकीहोळी यांनी पीपीई किट घालून आपला हक्क बजवला. आज सायंकाळी (17 एप्रिल) त्यांनी थेट गोकाक येथील रुग्णालयातून PPE Kit परिधान करून रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रावर येत मतदान केले आणि आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळपासून ते उपचार घेत होते. मात्र, या मोक्याच्या क्षणी त्यांनी पीपीई किट घालून मतदान करत पक्षासाठी योगदान दिलं.
त्यांची कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. शनिवारी चाचणीत अमरनाथ जारकीहोळी हे corona positive असल्याचे आढळून आले. त्यामुळे रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांनी देखील रुग्णालयात उपचार घेतले असून सध्या ते Home Quarantine आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कोरोना पॉझिटिव्ह जारकीहोळींनी पीपीई किट घालून केलं मतदान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm