बेळगाव : Just Married विवाह मंडपातून थेट मतदान

बेळगाव : Just Married विवाह मंडपातून थेट मतदान

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : आपल्या लग्नानंतर एका नवविवाहित जोडप्याने मतदान हे पहिले कर्तव्य मानून विवाह मंडपातून थेट मतदान केंद्र गाठून बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान केल्याची घटना बिजगर्णी (ता. बेळगाव) येथे आज घडली. बिजगर्णी येथील सुमित अष्टेकर या युवकाचा विवाह सोहळा आज शनिवारी सकाळी पार पडला. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठीचे मतदान देखील आजच होत आहे.
त्यामुळे आज बोहल्यावर चढलेल्या सुमित अष्टेकर याने आपल्या विवाहाचे सोपस्कार आटोपताच सहचारिणीला घेऊन लग्नाचा पोशाखही न बदलता मंडपातून थेट मतदान केंद्र गाठले. तसेच बिजगर्णी मतदान केंद्रामध्ये उभयतांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या पद्धतीने लग्नानंतर लोकसभा निवडणुकीचे मतदान हे पहिले कर्तव्य मानणाऱ्या सुमित अष्टेकर आणि त्याची पत्नी या नवविवाहित दाम्पत्याचे बिजगर्णी परिसरात कौतुक होत आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : Just Married विवाह मंडपातून थेट मतदान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm