बेळगाव : भाजपाच्या उमेदवार मंगला अंगडी आणि कुटुंबीयांचं मतदान;

बेळगाव : भाजपाच्या उमेदवार मंगला अंगडी आणि कुटुंबीयांचं मतदान;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार मंगला सुरेश अंगडी यांनी आपल्या दोन्ही मुलींसह मतदान केले. मतदान हा आपल्या सर्वांचा अधिकार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो संविधानातून दिला आहे. त्यामुळे सर्वांनी मतदान करायला हवं. पोटनिवडणुकीच्या मतदानाला शनिवारी सकाळी 7 वाजता प्रारंभ झाला. खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (17 एप्रिल) मतदान होत आहे.
बेळगावच्या इतिहासात ही दुसर्‍यांदा पोटनिवडणूक होत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सुरेश अंगडींच्या पत्नी मंगला अंगडींना भाजपाने उमेदवारी दिली आहे. अंगडी कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजप उमेदवार मंगला अंगडी तसेच त्यांच्या मुली डाॅ. स्फूर्ती अंगडी-पाटील आणि श्रद्धा अंगडी-शेट्टर यांनी विश्वेश्वरय्या नगरातील सरकारी शाळेत (मतदान केंद्र क्रमांक 3A) मतदान केले.
यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या कन्या डॉ. स्फूर्ती व श्रद्धा अंगडी उपस्थित होत्या. त्यांनीही यावेळी मतदान केले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानून आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : भाजपाच्या उमेदवार मंगला अंगडी आणि कुटुंबीयांचं मतदान;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm