बेळगाव : समितीच्या शुभम शेळके यांनी बजावला मतदानाचा हक्क

बेळगाव : समितीच्या शुभम शेळके यांनी बजावला मतदानाचा हक्क

belgavkar.com | belgaum | belgavkar

समितीच्या शुभम शेळके यांचे निवडणूक चिन्ह 'सिंह' आणि बॅलेटवरील क्रमांक 9;

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी शनिवारी (17 एप्रिल) सकाळी मतदान केले. समिती आणि शिवसेना युतीचे उमेदवार शुभम शेळके यांनी महाद्वार रोडवरील मराठी शाळा क्रमांक 12च्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यावेळी त्यांनी 2 लाखांहून अधिक मते मिळवण्याचा दावा केला आहे.
बेळगाव लोकसभा मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ झाला. खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात ही दुसर्‍यांदा पोटनिवडणूक होत आहे. बेळगाव लोकसभेच्या मतदानाला आज सकाळी 7 वाजता प्रारंभ झाला आहे.
काँग्रेसतर्फे सतीश जारकीहोळी आणि भाजपतर्फे मंगला अंगडी निवडणूक लढवत आहेत. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना चिन्हावरील आक्षेपानंतरही 'सिंह' हेच निवडणूक चिन्ह मिळाले आहे. तसेच त्यांचे नाव मतदान EVM मशीनवरील बॅलेट पेपरवर 9 नंबरला येणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : समितीच्या शुभम शेळके यांनी बजावला मतदानाचा हक्क
समितीच्या शुभम शेळके यांचे निवडणूक चिन्ह 'सिंह' आणि बॅलेटवरील क्रमांक 9;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm