बेळगाव : आक्षेपार्ह WhatsApp Status; दोघांविरोधात तक्रार

बेळगाव : आक्षेपार्ह WhatsApp Status;
दोघांविरोधात तक्रार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : महापुरूषांबाबत मोबाईलच्या स्टेटसवर आक्षेपार्ह संदेश ठेवल्याप्रकरणी कडोली येथील दोघा तरुणांविरोधात काकती पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी केतन कडेमनी (वय 20, रा. कडोली) याला अटक करण्यात आली आहे. एकजण फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सदर तरुणांनी 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीला आक्षेपार्ह संदेश मोबाईलच्या स्टेटसवर ठेवला होता. राष्ट्रीय महापुरुषाच्या छायाचित्राची विटंबना करुन सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यावरून संजय बसाप्पा कांबळे (रा. कडोली) यांनी काकती पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन काकती पोलिसांनी एकाला अटक केली आहे. काकती पोलिस पुढील तपास करत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : आक्षेपार्ह WhatsApp Status; दोघांविरोधात तक्रार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm