कर्नाटकात तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका लांबणीवर पडणार

कर्नाटकात तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका लांबणीवर पडणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे येत्या काळात जाहीर होणारी तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणूक लांबणीवर पडणार असल्याची माहिती ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री ईश्वराप्पा यांनी दिली. राज्यातील पोटनिवडणुका झाल्यानंतर तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात येत होती. त्यादष्टीने इच्छुकांनी तयारी चालविली आहे. परंतु त्यांच्या आकांक्षावर पाणी फेरण्याचे काम कोरोनाने केले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या काळात जि. पं., ता. पं. निवडणुका घेण्यात येणार नाहीत. देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार निवडणुका लांबणीवर टाकण्यात येणार आहेत. ता. पं. व जि. पं. सभागृहाची मुदत एप्रिल महिन्यात संपणार आहे. त्यामुळे पोटनिवडणुकानंतर निवडणुका घेण्याची तयारी करण्यात आली होती. परंतु कोरोनामुळे निवडणुकीवर अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटकात तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका लांबणीवर पडणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm