बेळगाव लोकसभा; 10 उमेदवार, निवडणूक चिन्ह आणि EVM मशीनवरील क्रमांक

बेळगाव लोकसभा;
10 उमेदवार, निवडणूक चिन्ह आणि EVM मशीनवरील क्रमांक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात 10 जण आहेत. बेळगाव लोकसभेसाठी एकूण 23 जणांनी 33 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्जमाघारीच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या केपी पाटील यांच्यासह 8 जणांनी अर्ज माघार घेतले आहेत. त्यामुळे सध्या निवडणुकीच्या रिंगणात 10 जण आहेत. काँग्रेसतर्फे सतीश जारकीहोळी आणि भाजपतर्फे मंगला अंगडी निवडणूक लढवत आहेत. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना चिन्हावरील आक्षेपानंतरही 'सिंह' हेच निवडणूक चिन्ह मिळाले आहे. तसेच त्यांचे नाव मतदान EVM मशीनवरील बॅलेट पेपरवर 9 नंबरला येणार आहे.
10 उमेदवार लोकसभा पोटनिवडणूक | इव्हीएम मशीनवरील बॅलेट पेपरवर नंबर
क्रमांक.उमेदवार निवडणूक चिन्ह
1. भाजपा - मंगला अंगडी कमळ
2. काँग्रेस - आमदार सतीश जारकीहोळी हात / पंजा
3. विवेकानंद बाबू घंटी - कर्नाटक राष्ट्र समिती शिट्टी
4. व्यंकटेश्वर महास्वामीजी - हिंदुस्थान जनता पार्टी ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी
5. सुरेश बसाप्पा मरीलिंगण्णावर - कर्नाटक कामगार पक्ष आँटो रिक्षा
6. अप्पासाहेब कुरणे (ईतर सर्व अपक्ष) कप बशी
7. गौतम यमन्नाप्पा कांबळे पंचींग मशिन
8. नागप्पा कळसन्नवर गॅस सिलेंडर
9. युवा समिती शुभम शेळके सिंह
10. श्रीकांत पडसलगी प्रेशर कुकर
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांचे नाव इव्हीएम मशीनवरील बॅलेट पेपरवर 2 नंबरवर, तर युवा समितीचे उमेदवार शुभम शेळके यांचे नाव 9 नंबरवर येणार आहे. बॅलेटवरील नावांचा क्रम निश्चित करताना राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, नोंदणीकृत अमान्यता पक्ष आणि आद्याक्षरानुसार अपक्ष उमेदवार असा लावला जातो. त्यानुसार बेळगाव मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंगला अंगडी यांचे नाव प्रथम (1) क्रमांकावर असेल.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव लोकसभा; 10 उमेदवार, निवडणूक चिन्ह आणि EVM मशीनवरील क्रमांक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm