देशातील परिस्थिती चिंताजनक, एकाच दिवशी विक्रमी 2.17 लाख नव्या रुग्णांची भर तर 1185 रुग्णांचा मृत्यू

देशातील परिस्थिती चिंताजनक, एकाच दिवशी विक्रमी 2.17 लाख नव्या रुग्णांची भर तर 1185 रुग्णांचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 2.17 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली असून 1185 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 1.18 लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. या आधी, बुधवारीही दोन लाखांच्या वर कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडली होती. त्यामुळे देशातली परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असल्याचं दिसून येतंय. 
देशातील आजची कोरोनाची स्थिती
एकूण रुग्णसंख्या : 1 कोटी 42 लाख 91 हजार 917
कोरोनावर मात केलेले एकूण रुग्ण : 1 कोटी 25 लाख 47 हजार 866
सध्याचे सक्रिय रुग्ण : 15 लाख 69 हजार 743
एकूण मृत्यू : 1 लाख 74 हजार 308
एकूण लसीकरण : 11 कोटी 72 लाख 23 हजार 509 
देशातील कोरोनाचा मृत्यूदर हा 1.23 टक्के आहे तर रिकव्हरी दर हा 88 टक्के इतका आहे. एकूण अँक्टिव्ह केसच्या प्रमाणात वाढ झाली असून ती 10 टक्क्याहून जास्त झाली आहे. कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतोय तर एकूण रुग्णसंख्येच्या बाबतील जगात दुसरा क्रमांक लागतोय. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

देशातील परिस्थिती चिंताजनक, एकाच दिवशी विक्रमी 2.17 लाख नव्या रुग्णांची भर तर 1185 रुग्णांचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm