बेळगाव : माजी मुख्यमत्र्यांनी त्यांना अननुभवी म्हंटले; लोकसभा पोटनिवडणूक

बेळगाव : माजी मुख्यमत्र्यांनी त्यांना अननुभवी म्हंटले;
लोकसभा पोटनिवडणूक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अननुभवी म्हंटले आहे. यावर उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी आक्षेप घेतला असून जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे. येथे आयोजित पत्रकार परिषदेत सिद्धरामय्यांनी बोलणाच्या ओघात महिलेचा अपमान केला आहे. कोणताही अनुभव नसणारी महिला संसदेत जाऊन काय कारणार...? असा प्रश्न त्यांनी केला होता.
आधी काँग्रेसचा इतिहास त्यांनी पहावा. देशात काँग्रेसची सत्ता असताना सोनिया गांधींना कोणता अनुभव होता...? जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर अननुभवी इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. महिलांच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करु नये, असे शेट्टर म्हणाले.
कित्तूर राणी चन्नम्मांच्या भूमीत येऊन सिद्धरामय्या यांनी महिलेचा अपमान केला आहे. काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना संसदेचा किती अनुभव आहे..? दोनवेळा ते विधान परिषद आणि तीनवेळा विधानसभेवर निवडून आले तर त्यांनी किती समस्या साडवल्या, असे शेट्टर यांनी विचारले.
>> मतदान – 17 एप्रिल शनिवार 2021
>> निवडणूक निकाल – 2 मे शनिवार 2021
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर काँग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदरवार 26 वर्षीय शुभम शेळके यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची लढत तिरंगी झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : माजी मुख्यमत्र्यांनी त्यांना अननुभवी म्हंटले; लोकसभा पोटनिवडणूक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm