बेळगाव : सख्ख्या भावाचा केलायं खून
Photo. 1 भरमु शिवाजी कोळी Photo 2. बंडू कोळी

बेळगाव : सख्ख्या भावाचा केलायं खून

belgavkar.com | belgaum | belgavkar

सख्ख्या भावाने काढला सख्ख्या भावाचा काटा, तीक्ष्ण चाकूने केला खून

बेळगाव : चिकोडी तालुक्यातील नेज या गावात शौचालय बांधण्याच्या जागेवरून मोठ्या भावाचा धाकट्या भावाने चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. भरमु शिवाजी कोळी (वय 30) असे खून झालेल्या मयत भावाचे नाव आहे. तर बंडू शिवाजी कोळी (वय 28) असे हत्येचा आरोप असलेल्या लहान भावाचे नाव आहे. या प्रकरणात सदलगा (ता. चिकोडी) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेज येथील शेतीवाडीतील घराच्या परसात भरमू शिवाजी कोळी याने शौचालय बांधकाम करण्यासाठी खड्डा काढला होता. त्याचा भाऊ बंडू शिवाजी कोळी याचे घर सखल भागात असल्याने पाणी जात होते. याबद्दल बंडू याने आपल्या हद्दीत पाणी का काढले, या कारणावरून भांडण काढले. यावेळी पाण्यावरून धाकटा भाऊ मोठ्या भावाच्या घरात जावून भांडू लागला. शौचालयाचे पाणी माझ्या घराजवळ येत आहे, या कारणाने मला त्रास होतो असा मोठ्या भावाला जाब विचारला. भरमू याची पत्नी मीनाक्षी हिने आपल्या माहेरून वडील व भावाला बोलावून घेऊन वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.
हा वाद वाढत गेल्यानंतर आरोपी बंडू कोळी याने दारूच्या नशेत घरातून चाकू आणला आणि झालेल्या भांडणात लहाने भावाने मोठा भाऊ भरमूच्या पोटावर आणि चाकूचे वार केले. अन् शेवटी या भांडणात आपल्या भावाची हत्या केली. बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हत्येनंतर आरोपी बंडु कोळीने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. याबाबत सदलगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून बंडू कोळीविरूध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
भांडण सोडविण्यास गेलेल्या मेहुण्यावरही वार : भांडण सोडविण्यास गेलेला भरमू कोळी याचा मेहुणा प्रमोदकुमार कोळी (वय 24, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ) याच्या पोटावर वार करण्यात आला. त्यामुळे तोही जखमी झाला आहे. त्याच्यावर चिकोडी येथील सरकारी दवाखान्यात उपचार चालू आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : सख्ख्या भावाचा केलायं खून
सख्ख्या भावाने काढला सख्ख्या भावाचा काटा, तीक्ष्ण चाकूने केला खून

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm