नातेवाईकांची करामत! कोरोनाबाधिताला पार्सलच्या नावाखाली पोहोचवली दारू

नातेवाईकांची करामत! कोरोनाबाधिताला पार्सलच्या नावाखाली पोहोचवली दारू

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णाला टरबुजमधून खर्रा तर फळांचा ज्यूस असल्याचे सांगून पार्सलमधून विदेशी दारू पाठविण्याचा प्रकार कोरोनाबाधित रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. यवतमाळच्या (महाराष्ट्र) वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हा प्रकार समोर आला. परंतु रूग्णालय प्रशासनाने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. या कोरोनाबाधित रुग्णांसाठी त्यांच्याच नातेवाईकांनी ही अनोखी शक्कल लढविली होती. तर काही जणांनी रूग्णांना पार्सलमधून विदेशी दारू पुरविण्याचा प्रयत्नही केला.
रूग्णांना दारू पाठविताना कोणाला शंका येऊ नये, यासाठी फळाचे ज्यूस व घरचं जेवण आहे, असे वाटावे या पध्दतीने रुग्णालयात खाद्यपदार्थ पार्सल करुन पाठवण्यात आले होते. परंतु सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्यांनी ती पार्सल उघडून पाहिले असता. त्यात दारू असल्याचे उघडकीस आले.
कोरोना रूग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही दिवसांनी ते रूग्ण उपचार घेतल्यानंतर बऱ्यांपैकी धोक्यातून बाहेर आलेले असतात. त्यानंतर त्यांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात येते. त्याच ठिकाणी असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांनी ही अफलातून शक्कल लढविली होती. मात्र हा प्रयत्न वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

नातेवाईकांची करामत! कोरोनाबाधिताला पार्सलच्या नावाखाली पोहोचवली दारू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm