बेळगाव : भरदिवसा मारहाण करून ट्रक चोरी

बेळगाव : भरदिवसा मारहाण करून ट्रक चोरी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत आप्पाचीवाडी फाटा येथे बुधवारी 7 ते 8 टोळीने ट्रकमालकास धाक दाखवून, बेदम मारहाण करून ट्रक पळवला. रमेश प्रल्हाद पोवार (रा. खटाव, जिल्हा सातारा) असे ट्रकमालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद ग्रामीण पोलिसांत दिली असून भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रमेश पोवार यांनी बळ्ळारी येथून एका फायनान्स कंपनीने केलेल्या लिलावातून 16 चाकी मालवाहू ट्रक 18 लाख रुपयांना खरेदी केला होता. तो ट्रक आपल्या मूळ गावी ते घेऊन जात होते.
8 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता सौंदलगा हद्दीतील आप्पाचीवाडी फाटा येथील सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला ट्रक उभा करून पोवार काही अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी गेले. चहा घेऊन ते परत आले असता मोटारीतून आलेल्या अज्ञात 8 जणांनी पोवार यांना धाक दाखवून बेदम मारहाण केली. त्यांच्याजवळील रोख रक्कम, एटीएम कार्ड, वाहनाची कागदपत्रे आदी साहित्य आपल्या ताब्यात घेऊन ट्रकसह त्यांचे अपहरण करून पोबारा केला.
9 एप्रिल रोजी सायंकाळी पोवार यांनी अज्ञातांची नजर चुकवून आपली सुटका करून घेतली. त्यानंतर त्यांनी मंगळवारी 13 एप्रिल रात्री उशिरा याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडीचे उपअधीक्षक मनोजकुमार नायक, सीपीआय संतोष सत्यनायक, ग्रामीणचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पोवार यांच्याकडून घटनाक्रम जाणून घेतला. पोलिस अधिक तपास करत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : भरदिवसा मारहाण करून ट्रक चोरी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm