बेळगाव : बस अडवणार्‍या 19 जणांविरोधात मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल

बेळगाव : बस अडवणार्‍या 19 जणांविरोधात मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : सहावा वेतन लागू करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी गेले 9 दिवस संप पुकारुनही सरकार दाखल घेत नसल्याच्या निषेधार्थ परिवहन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी बस अडवली होती. बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने कर्नाटक राज्य शासनाने काही पर्यायी चालक - वाहकांची नियुक्ती केली आहे. परंतु, त्यांना अडवून जाब विचारणाऱ्या व अर्वाच्च शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या सुमारे 19 जणांविरोधात मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी चालक वेंकय्या सिद्धय्या मठपती (केएसआरटीसी द्वितीय डेपो) यांनी फिर्याद दिली आहे.
त्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न
मागील दोन दिवसांपासून यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील सहभाग घेतला आहे. आपल्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नसल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयातील एका महिला सदस्याने धावत्या बसमध्ये चढून बस चालकाला आपल्या गळ्यातील मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न केला. ती महिला त्या बसच्या चालकाला मंगळसूत्र घालण्याचा वारंवार प्रयत्न करत होती. त्या चालकांच्या अंगावर दोन महिला धाऊन जात होत्या, तरीही त्या चालकाने आपला संयम कायम ठेवत महिलेला फक्त विरोध केला.
बसबाहेर असलेल्या पोलिसांना त्यांनी याकडे लक्ष देण्यास सांगितले. त्यानंतर बसचा चालकाच्या बाजूचा दरवाजा काढण्यात आला. त्यातून तो चालक बाहेर आला. बसमध्ये काहीवेळा तणाव निर्माण झाला होता. त्यानुसार बसवराज गंगाप्पा वग्गर, बस कर्मचाऱ्याचा मुलगा महेश सिद्राय शिग्गेहळ्ळी व आणखी एका बस कर्मचाऱ्याची पत्नी सुकन्या दुर्यो धन पम्मार यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. बसचालक वेंकय्या मठपती हेसुळेभावीला जाऊन बस घेऊन येत होते.
यावेळी सीबीटीजवळ उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी त्यांची बस सर्कीट हाऊसजवळ अडवली. सुमारे 16 महिलांनी आमचे पती आंदोलनात सहभागी असताना तुम्ही का बस चालवताय, असा त्यांना जाब विचारला. शिवाय अर्वाच्च शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. मार्केट पोलिसांत फिर्याद दिल्याने याची नोंद झाली आहे. निरीक्षक संगमेश शिवयोगी तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बस अडवणार्‍या 19 जणांविरोधात मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm