बेळगाव : 3 चोरट्यांना अटक; 4 दुचाकीसह टमटम जप्त

बेळगाव : 3 चोरट्यांना अटक;
4 दुचाकीसह टमटम जप्त

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : तालुक्यातील केके कोप्पसह परिसरातून दुचाकींची चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 4 लाख रुपये किमतीच्या 4 दुचाकी आणि 1 मालवाहू टमटम जप्त करण्यात आली आहे. तुकाराम ऊर्फ किरण पराप्पा कम्मार (वय 20), श्रीधर अर्जुन कम्मार (23), राजू नागराज कम्मार (20, तिघेही रा. बडस खर्द, ता. बेळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
वरील तिघा संशयितांनी हिरेबागेवाडी, केके कोप्प परिसरातून दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार त्यांच्याकडून त्यांच्याकडून 4 दुचाकी व 1 चार चाकी टमटम वाहन जप्त केले आहे. हिरेबागेडीचे पोलिस निरीक्षक शरणगौडा हिरेकेंचगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोविंदगौडा पाटील, एस. डी. कोलार, वाय. बी. हत्तरवाट, एस. एस. भावी, आर. एस, केळगीनमणी. पी. बी. बेवीनमट्ट, एम. एस. मंटूर यांनी ही कारवाई केली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 3 चोरट्यांना अटक; 4 दुचाकीसह टमटम जप्त

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm