गुढीपाडव्याला सोने महाग

गुढीपाडव्याला सोने महाग

belgavkar.com | belgaum | belgavkar

सोने चांदी आजचा भाव, 13 एप्रिल 2021 : स्थानिक बाजारात सकाळी सोने आणि चांदीच्या भावात तेजी पाहायला मिळाली. बेळगावात सोन्याचे भाव 200 रुपये म्हणजेच किरकोळ वाढीसह 47,800 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याशिवाय मंगळवारी सकाळी जागतिक बाजारपेठेतही स्पॉट आणि फ्युचर्सच्या दोन्ही भावात घट दिसून आली.
वायदा बाजारात चांदीची किंमत : दुसरीकडे, चांदीबाबत बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी चांदीच्या किंमतीत वाढ दिसली आहे.  मे 2021 रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजला डिलिव्हरी चांदीची किंमत 298 रुपये किंवा 0.45  टक्क्यांनी वाढून 66,426  रुपये प्रती किलो झाली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोमवारी सकाळी चांदीच्य वायदा भावात घट तर स्पॉटच्या किंमतींमध्ये थोडी तेजी दिसून आली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी वायदा भावात घट पाहायला मिळाली. कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 7.80 डॉलर म्हणजे 0.45 टक्क्यांच्या घटीसह 1,724.90  डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव 0.45 टक्के म्हणजे 7.81 डॉलरच्या घटीसह 1,724.95  डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता. 
आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी : आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली. चांदीची किंमत 0.01 टक्क्यांनी घटीसह 24.87 डॉलर प्रति औंसवर स्थिरावली. बाजारात चांदीची किंमत  0.01 डॉलर म्हणजे 0.03 टक्के वाढीसह 24.83 डॉलर प्रति औंस सुरू होती. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

गुढीपाडव्याला सोने महाग

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm