बेळगाव : विद्यार्थीनीच्या अपहरण प्रकरणी फिर्याद दाखल

बेळगाव : विद्यार्थीनीच्या अपहरण प्रकरणी फिर्याद दाखल

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : टिळकवाडीतील एका विद्यार्थिनीचे अपहरण करण्यात आले आहे. विद्यार्थीनीच्या अपहरण प्रकरणी 5 एप्रिल रोजी तिच्या वडिलांनी टिळकवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित म्हणून सौरभ तानाजी जाधव (रा. महर्षी महर्षी रोड, टिळकवाडी) याच्याविरोधात अपहरणाची तक्रार दाखल करून घेतली आहे.
संशयित सौरभने युवतीबरोबर जवळीक वाढविली होती. त्यामुळे त्याला यापूर्वी दोन ते तीन वेळा समज देण्यात आली होती. युवती ही महाविद्यालयाला जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर गेले होती. मात्र, ती घरीच परतली नाही. सर्वत्र शोधाशोध घेऊनही तिचा कोठेच थांगपत्ता लागू शकला नाही. त्यामुळे आपल्या मुलीचे सौरभने अपहरण केल्याची फिर्यादी युवतीच्या वडिलांनी दिली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : विद्यार्थीनीच्या अपहरण प्रकरणी फिर्याद दाखल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm