वाढता वाढता वाढे! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,61,736 नवे रुग्ण, 879 जणांचा मृत्यू; नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला

वाढता वाढता वाढे! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,61,736 नवे रुग्ण, 879 जणांचा मृत्यू;
नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला

belgavkar.com | belgaum | belgavkar

जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 13 कोटींच्या वर गेली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 1,36,89,453 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. 
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,61,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 879 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,36,89,453 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (13 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 1,61,736 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 71 हजारांवर पोहोचला आहे. 
मृत्यू : महाराष्ट्रातील 349, छत्तीसगड 122, उत्तर प्रदेश 67, पंजाब 59, गुजरात 54, दिल्ली 48, कर्नाटक 40, मध्य प्रदेश 24, तमिळनाडू 22, झारखंड 21, केरळ आणि हरियाणा प्रत्येकी 16 आणि राजस्थान तसंच पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 10 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत 1,70,179 जणांचा मृत्यू झाल आहे. यातील सर्वाधिक 57,987 रुग्ण हे महाराष्ट्रातील होते. आरोग्य मंत्रालयानं सांगितलं, की ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, यातील 70% टक्क्यापेक्षा अधिक लोकांना आधीपासूनच काहीतरी आजार होते.
India reports 1,61,736 new #COVID19 cases, 97,168 discharges and 879 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,36,89,453
Total recoveries: 1,22,53,697
Active cases: 12,64,698
Death toll: 1,71,058
Total vaccination: 10,85,33,085

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

वाढता वाढता वाढे! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,61,736 नवे रुग्ण, 879 जणांचा मृत्यू; नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm