यावर्षीची गुढी मनोधैर्य वाढवण्याची... दुर्गवीर प्रतिष्ठान

यावर्षीची गुढी मनोधैर्य वाढवण्याची... दुर्गवीर प्रतिष्ठान

belgavkar.com | belgaum | belgavkar

गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा कोरोनान थैमान माजवल आहे. शहर असो वा गाव असो प्रत्येक ठिकाणी यावर लढा सुरू आहे. यावर नेमकं काय बोलावं शब्दच सुचत नाही. जे या परिस्थितीतुन जात आहेत. त्यांच्याच मनाला ठाऊक. आर्थिक गणित तर इतकं बिघडलंय की सद्यस्थितीत काय करावं यावर विचार व लढा देण्याच काम जनसामान्यांन करीत आहेत. मग अश्या परिस्थितीत गुढी कशी उभी करायची.यावर्षीही थांबायचे हेच ठरलंय..
दरवर्षी पाडव्याच्या आदल्या रात्री गडावर मशाली धगधगत असतात, झेंडूच्या माळा तयार करण्याची लगबग असते. अश्या सर्व आनंदाच्या वातावरणात तयारी चालू असे.,यावर्षी हे होणार नाही. या आपत्कालीन परिस्थितीत आपण थांबलेलंच बरं. गडप्रेमी आणि दुर्गवीर सहकऱ्यांनो आपण या कोविड-19 च्या काळात काळजी घेऊयात. एकमेकांना मदत करूयात. अन या गुढीला सहकार्याची, मनोधैर्य वाढवण्यासाची एकदिलाने आपल्या कार्यातून उद्याची गुढी उभी करूयात. अन पुढील वर्षी जोमाने गुढीपाडवा साजरा करूयात. हीच सर्व दुर्गवीरांच्या मनोमनी इच्छा...
होय आता गडकिल्ले व पुरातन वास्तू संवर्धन कार्यात तळागाळात दुर्गवीरांची ताकत बळकट होऊ लागली आहे. कोल्हापूर असो वा रत्नागिरी किंवा रायगड, सिंधुदुर्ग, बेळगाव..... श्रमदानातून संवर्धनासाठी तरुण तरुणींचा सहभाग वाढू लागलाय. एक संस्था म्हणून दुर्गवीर दिवसेंदिवस भक्कम होऊ लागली आहे. या कार्यात जो विश्वास दाखवून आम्हां खांद्याला खांदा लावून कार्य करू इच्छिणाऱ्या सर्व गडप्रेमी व शिवप्रेमींचे खूप खूप आभार. गेली 6 वर्ष सातत्याने बेळगाव, चंदगडसह ईतर तालुक्यातील दुर्गवीर या किल्ल्यावर श्रमदानच कार्य करत आहेत. आणि या 6 वर्षात बरेचशे गडाचे अवशेष, तोफा, शौचकूप शोधून काढण्याचं कार्य दुर्गवीरांनी केलेलं आहे.
आपल्या देखील अश्या मोहीमेत सामील व्हायचे असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा.
9740103131-अभिजीत अष्टेकर(बेळगाव)
9845222126- संजय गावडोजी (बेळगाव)
9591447213- सागर मुतकेकर (बेळगाव)
9870101231-संदीप गावडे(चंदगड)
9011376230-अजित पाटील(चंदगड)
#दुर्गवीर
#durgveer

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

यावर्षीची गुढी मनोधैर्य वाढवण्याची... दुर्गवीर प्रतिष्ठान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm