बेळगाव : बेकायदा दारू विक्री; एकाला अटक

बेळगाव : बेकायदा दारू विक्री;
एकाला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : निपाणी शहराच्या पश्चिमेला असलेल्या यरनाळ येथे बेकायदा दारू विकणाऱ्या एकावर निपाणी शहर पोलिसांनी रविवारी (11 एप्रिल) रात्री कारवाई केली. सुरेश पांडुरंग संत (वय 48) असे संशयिताचे नाव आहे. गेल्या काही दिवसापासून सुरेश बेकायदा दारू विक्री करीत असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांना मिळाली होती.
त्यानुसार कुंभार यांनी सहकाऱ्यांसमवेत सापळा रचून गावावरील पाटोळे माळ पाण्याच्या टाकीजवळ रंगेहाथ पकडून 450 रुपये रोख रक्कम व दारूसाठा असा एकूण 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित संशयित आरोपीवर निपाणी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बेकायदा दारू विक्री; एकाला अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm