बेळगाव : मुरगुंडी ते गोटूरपर्यंत चौपदरी राष्ट्रीय महामार्ग; 788 कोटींचा निधी मंजूर

बेळगाव : मुरगुंडी ते गोटूरपर्यंत चौपदरी राष्ट्रीय महामार्ग;
788 कोटींचा निधी मंजूर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : विजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील मुरगुंडी ते बेळगाव जिल्ह्यातील गोटूरपर्यंत (ता. हुक्केरी) चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी आराखडा केला जात आहे. तोपर्यंत या रस्ताच्या तात्पुरत्या कामासाठी राज्य सरकारकडून दोन पॅकेजमध्ये 766.64 कोटी व 21.88 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती चिकोडी-सदलगा मतदार संघाचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली. येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, देशाचे भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मुरगुंडी ते गोटूरपर्यंत (राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या संकेश्वरजवळ) चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीची मागणी केली होती. याविषयी आराखडा तयार केला जात आहे. काम सुरू व पूर्ण होण्यापर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्त्याचे तात्पुरते काम सुरू करण्यासाठी 21.88 कोटी व 766.64 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
यात विजापूर ते मुरगुंडी (अथणी तालुका) दुपदरी मार्ग 80 किमीचे काम 766.64 कोटी व महाराष्ट्र हद्दीपासून गोटूरपर्यंत रस्ता निर्मितीचे काम 21.88 कोटीतून पूर्ण केले जाणार आहे. सदर निधी कंत्राटदाराला 60 टक्के कर्जस्वरूपात तर 40 टक्के केंद्र सरकार देणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मुरगुंडी ते गोटूरपर्यंत चौपदरी राष्ट्रीय महामार्ग; 788 कोटींचा निधी मंजूर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm