बेळगाव : मोठ्या भावाचा डोक्यात दगड घालून खून

बेळगाव : मोठ्या भावाचा डोक्यात दगड घालून खून

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. गोकाक : दारुच्या नशेत किरकोळ कारणावरून झालेला वाद विकोपाला गेल्याने लहान भावाने मोठ्या भावाचा डोक्यात दगड घालून खून केला. संगणकेरी (ता. गोकाक) येथे शनिवारी (10 एप्रिल) सकाळी ही घटना घडली. लक्ष्मण तिगडी (वय 42) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी नागाप्पा तिगडी (वय 26) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत घटप्रभा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, संगणकेरी येथील दोघा भावांमध्ये शनिवारी पहाटे किरकोळ कारणावरून वादावादी झाली. हा वाद विकोपाला गेल्यामुळे दारुच्या नशेत असलेल्या नागाप्पाने लक्ष्मणच्या डोक्यात दगडाने गंभीर घाव घातले. त्यात लक्ष्मणचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी ही बातमी समजताच घटप्रभा पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीशैल ब्याकूड व उपनिरीक्षक आर. एस. खोत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवचिकित्सेसाठी सरकारी रुग्णालयाकडे पाठवून देण्यात आला. याप्रकरणी संशयित आरोपी नागाप्पा याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मोठ्या भावाचा डोक्यात दगड घालून खून

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm