बेळगाव : धर्मवीर संभाजी महाराज चौक; बुरुज व कमान उभारून परिसराचा विकास व सुशोभिकरण

बेळगाव : धर्मवीर संभाजी महाराज चौक;
बुरुज व कमान उभारून परिसराचा विकास व सुशोभिकरण

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : धर्मवीर संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराज मूर्तीच्या सभोवती बुरुज व कमान उभारून परिसराचा विकास व सुशोभिकरण करण्यात येणार आहे. याकरिता 32 लाखांच्या निधीची तरतूद केली असून काम प्रगतिपथावर आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध चौकांचा विकास करण्यात येणार आहे. मात्र, धर्मवीर संभाजी चौकातील मूर्तीच्या परिसराचा विकास मनपावतीने करण्याचे काम 3 वर्षांपासून सुरू आहे. मूर्तीच्या सभोवती भिंत बांधून सुशोभिकरण केले होते.
मूर्तीच्या मागील बाजूची भिंत व कमानीचा आराखडा मंजुरीसाठी मनपाकडे देण्यात आला होता. माजी महापौर सरिता पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे दुसऱ्या टप्प्यात 12 लाखाचा निधी मंजूर झाला होता. विविध कारणांमुळे हे काम मार्गी लागले नव्हते. मात्र, सुशोभिकरणाचे हे काम पूर्ण करण्यासाठी आमदार अनिल बेनके यांनीही निधी मंजूर केला आहे. उर्वरित अनुदान आमदार फंडातून मंजूर कले आहे.
त्यामुळे मागील बाजूस किल्ल्याप्रमाणे बुरुज बनविण्यात येणार आहे. कमानही उभारण्यात येणार आहे. या परिसराच्या सुशोभिकरणासाठी 32 लाखांचा आराखडा तयार केला आहे. सदर काम प्रगतिपथावर असून, मूर्तीच्या मागील बाजूस भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच हा परिसर आकर्षक होणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : धर्मवीर संभाजी महाराज चौक; बुरुज व कमान उभारून परिसराचा विकास व सुशोभिकरण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm