बेळगावच्या स्मार्ट रेल्वे स्थानकाचे काम युद्धपातळीवर; 170 कोटी रुपयांतून नूतनीकरण

बेळगावच्या स्मार्ट रेल्वे स्थानकाचे काम युद्धपातळीवर;
170 कोटी रुपयांतून नूतनीकरण

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. जुलैपर्यंत मुख्य इमारतीचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर पाठीमागील बाजूच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या इमारतीचे काम सुरु केले जाईल. सुमारे 170 कोटी रुपयांतून बेळगाव रेल्वे स्थानक 'स्मार्ट' होत आहे. रेल्वे स्थानक नूतनीकरणाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. रेल विकास निगम लिमिटेडकडून हा विकास केला जात आहे. येत्या काही महिन्यात बेळगावकरांचे स्मार्ट रेल्वे स्थानकाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून बेळगाव रेल्वे स्थानकाचे काम सुरु आहे. कोरोनाच्या काळात सुमारे पाच महिने काम बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे विकासकामाला उशीर झाला आहे. मात्र, आता कामाला गती प्राप्त झाली आहे. नवीन इमारतीत ग्राऊंड व तीन मजल्याचे काम पूर्ण झाले आहे. कामकाज नव्या इमारतीत लवकरच स्थलांतरीत केली जाणार आहेत. ज्या ठिकाणी जुनी इमारत होती, त्याठिकाणी असलेल्या प्लॅटफॉर्मवर शेड उभारण्यात येणार आहे. ग्राऊंड तसेच एक मजली इमारत या ठिकाणी उभारली जाणार आहे. ऑक्टोंबरपर्यंत या इमारतीचे काम पूर्ण होईल.
या ठिकाणी सध्या तीन प्लॅटफॉर्म आहेत. यानंतर 4 प्लॅटफॉर्म होणार आहेत. इमारतीसाठी लागणारे बांधकाम साहित्य इमारतीच्या समोर पडले आहे. त्यामुळे पार्कीगची समस्या येत आहे. मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेले साहित्य हटवून दुचाकी पार्किंगही केले जाणार आहे. मात्र, यासाठी अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. बेळगाव रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. मुख्य इमारतीचे काम जुलै तर मागील बाजूच्या इमारतीचे काम ऑक्टोबरपर्यंत होईल.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावच्या स्मार्ट रेल्वे स्थानकाचे काम युद्धपातळीवर; 170 कोटी रुपयांतून नूतनीकरण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm