बेळगावच्या नवरदेवाला अटक; वर्जिनिटी चाचणी अन् फांदी मोडली; दोन्ही भावांनी लग्न मोडलं!

बेळगावच्या नवरदेवाला अटक;
वर्जिनिटी चाचणी अन् फांदी मोडली;
दोन्ही भावांनी लग्न मोडलं!

belgavkar.com | belgaum | belgavkar

फांदी मोडली, वर्जिनिटी चाचणीत नवविवाहिता नापास, वरबंधूंनी लग्न मोडलं!
कोल्हापूर : समाजात आजही अनेक अघोरी प्रकार बघायला मिळतात आणि असाच एक प्रकार पुरोगामी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात समोर आला आहे. कौमार्य चाचणीत अपयशी ठरल्याने दोन सख्ख्या बहिणींना तोंडी घटस्फोट देऊन विवाहानंतर तिसऱ्या दिवशी कोल्हापूरला माहेरी पाठविल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी पती संदीप सनी कांजारभाट-गागडे (वय 25, रा. घर क्रमांक 199, हनुमाननगर, बेळगाव, रा. कर्नाटक) याला अटक केली, तर त्याचा दुसऱ्या मुलीचा पती सुरजित कांजारभाट-गागडेसह सात जण अद्याप पसार आहेत, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कोल्हापुरात राहणाऱ्या कंजारभाट समाजातील एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींचा विवाह बेळगाव (कर्नाटक) येथील हनुमाननगरातील संदीप व सुरजित गागडे या भावांसोबत 27 नोव्हेंबर 2020 ला झाला होता. विवाह थाटामाटात झाला. दोन्ही कुटुंबीय एकाच समाजातील असल्याने त्यांच्यात कोमार्य चाचणीची पद्धत आहे. त्यानुसार या दोन्ही मुलींची परीक्षा घेण्यात आली. विवाहाच्या पहिल्याच रात्री या दोन्ही तरुणींची कौमार्य (वर्जिनिटी) चाचणी केल्याच उघड झालंय. बेळगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. त्या दोन्हीही बहिणींची कोमार्य चाचणी (virginity test) घेण्यात आली. त्यामध्ये एक मुलगी अपयशी ठरली. लग्नांनतर तीन दिवस या मुलींशी त्या पतींनी त्यांच्याशी शारीरिक संबंधही ठेवले. त्यांनंतर त्यांनी त्या दोघींना घरातून हाकलून काढून कोल्हापुरात माहेरी पाठवले.
kolhapur-kanjarbhat-caste-panchayat-test-of-virginity-brides-case-register-against-groom-from-belgaum-at-rajarampuri.jpg | बेळगावच्या नवरदेवाला अटक; वर्जिनिटी चाचणी अन् फांदी मोडली; दोन्ही भावांनी लग्न मोडलं! | belgaum news | belgavkar बेळगावकर
यापेक्षा धक्कादायक म्हणजे या चाचणीत दोन्ही तरुणी नापास ठरल्याचा दावा करुन झाडाची फांदी मोडून, जात-पंचायत भरवून जात पंचायतीने हा विवाह मोडीत काढला. या धक्कादायक प्रकाराने कोल्हापूर आणि बेळगाव सीमाभागात खळबळ उडाली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा सगळा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी तरुणींना आणि त्यांच्या आईला विश्वासात घेऊन राजारामपुरी पोलीस ठाणे गाठलं. घटनेनंतर संबंधित दोन्ही मुलींच्या चारित्र्यावर संशय घेत सासरच्या लोकांकडून त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले, तसेच दोघींना घरातून हाकलून कोल्हापुरात माहेरी पाठविले.
समाजातील जात पंचायतीनेही त्यांच्या नात्याचा काडीमोड केला. दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या मदतीने त्यांनी गुरुवारी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री पती संदीप कांजारभाट-गागडे याला अटक केली. त्यानुसार गुरुवारी राजारामपुरी पोलीस ठाण्यात संदीप गागडे, सुरजीत गागडे या दोघा भावांसह शोभा सनी गागडे, ईश्वर गागडे यांच्याविरोधात तक्रार दिली. दुसऱ्या मुलीचा पती सुरजित गागडे, त्याची आई, एक नातेवाईक व जात पंचायतचे चौघे, असे गुन्हा दाखल झालेले सात जण अद्याप पसार आहेत. दोन्ही नवरदेवांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे यापैकी एक नवरदेव हा भारतीय सैन्य दलात असून, त्याने आपल्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
या दोन्ही तरुणी सध्या कोल्हापूरमध्येच वास्तव्याला आहेत. आम्ही तुम्हाला नांदवणार नाही असं जात पंचायतीमार्फत सासरच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. त्यामुळे कौमार्य चाचणी करणाऱ्या कुटुंबावर कडक कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. कौमार्य परीक्षेत ‘फेल’ गेल्यामुळे बेळगावमधील सासरच्या लोकांनी या दोघींनाही नांदवण्यास नकार दिला असून त्यांना त्यांच्या घरी पाठवून देण्यात आले. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नसून कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिरात जातपंचायत बसवून त्यांचा काडीमोड करून त्यांना वेगळे करण्यात आल्याची घटना घडली. शिवाय यापुढे या दोन्ही मुलींचा काहीही संबंध नाही, असे पंचांसमोर सर्वांना सांगण्यात असल्याचा अजब न्यायनिवाडा करण्यात आला आहे. याबद्दल आता सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
पीडित मुलींच्या कुटुंबियांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे रीतसर लेखी दाद मागितली. त्यानुसार आम्ही पीडित मुलींना घेऊन समितीच्या गीता हसूरकर, सीमा पाटील, रमेश वडणगेकर, सुजाता म्हेत्रे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
-सुजाता म्हेत्रे (अंनिस पदाधिकारी)


बाभळीच्या काड्या अन् काडीमोड : शाहू टोल नाक्यानजीक मंदिरात जातपंचायतीने पीडित मुली व संशयित दोघा आरोपींसह त्यांची आई यांच्यासमोर बाभळीच्या पाच काड्या समोर ठेवल्या. त्या एकमेकांवर पाच वेळा मारून त्या मुलींवरून उतरून दोन्ही बाजूला टाकल्या, झाले काडीमोड. असा जातपंचायतीचा नात्यातील काडीमोडची प्रथा असल्याचे पीडितांनी सांगितले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावच्या नवरदेवाला अटक; वर्जिनिटी चाचणी अन् फांदी मोडली; दोन्ही भावांनी लग्न मोडलं!

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm