बेळगाव : तिच्या नातवाला शैक्षणिक साहित्य आणि अनेक भेटवस्तू

बेळगाव : तिच्या नातवाला शैक्षणिक साहित्य आणि अनेक भेटवस्तू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कुटुंब चालविण्यासाठी भाजी विक्री करणाऱ्या आजीसोबत येणाऱ्या तिच्या नातवाला फेसबुक फ्रेंड्स सर्कलने शैक्षणिक साहित्य आणि अनेक भेटवस्तू दिल्या. यामुळे हा लहानगा हरखून गेला. मंडोळी येथील एक आजी आपल्या पाचवीमध्ये शिकणाऱ्या नातवासमवेत दुसऱ्या रेल्वेगेटजवळ भाजी विक्रीसाठी येते. लक्ष्मी बेकवाडकर असे तिचे नाव असून समवेत निखिल हा नातूसुद्धा दररोज येतो.
आजीची भाजी विकून होईपर्यंत तो आजीला सोबत करतो आणि तेथेच खेळत राहतो. थोड्याच दिवसात या मुलाने सर्वांनाच लळा लावला आहे. फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांनी या मुलाला पाहिले आणि त्याची चौकशी केली. आणि त्याला शैक्षणिक साहित्याचा संच भेट दिला. यासाठी राहुल देशपांडे यांनी विशेष पुढाकार घेतला. ते स्वतः फुटबॉलपटू असून शिक्षण आणि खेळ यासाठी विद्यार्थ्यांना मदत करण्यात त्यांचा पुढाकार असतो. आजपर्यंत त्यांनी अनेक खेळाडूंना आणि विद्यार्थ्यांना मदत केली आहे.
मात्र, बऱ्याचवेळा ते प्रसिद्धीपासून दूर राहतात. त्यांनी अनेकदा रक्तदानही केले आहे. भाजी मार्केटमध्ये आपल्या पालकांसमवेत किंवा आजीसमवेत असे अनेक विद्यार्थी येत आहेत. शेतकयांना भाजी विकणेसुद्धा कठीण होत आहे. वाहतूक व इंधन खर्च त्यांना परवडत नाही. त्यामुळे नातवंडांच्या शिक्षणावर ते खर्च करू शकतील, असे नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, असे राहुल आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलला वाटते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : तिच्या नातवाला शैक्षणिक साहित्य आणि अनेक भेटवस्तू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm