बेळगाव : कंग्राळ गल्लीतील एकाला अटक

बेळगाव : कंग्राळ गल्लीतील एकाला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव—belgavkar : मंगळसूत्र हिसकावून घेऊन पलायन केलेल्या चोरट्याला केवळ एका दिवसात एपीएमसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. सोमेश लक्ष्मण शंभूचे (वय 37, रा. कंग्राळ गल्ली, बेळगाव) असे त्याचे नाव असून शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
त्याच्याकडून 2 लाख 12 हजारांचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी प्रीती नार्वेकर यांनी गुरुवारी सायंकाळी एपीएमसी पोलिस स्थानकात फिर्याद दिली होती. प्रीती या गुरुवारी सायंकाळी एपीएमसीनजीकच्या साखरे किराणा दुकानाजवळून चालत जात असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका भामट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेऊन पलायन केले होते.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपाचक्रे गतिमान करत अवघ्या एका दिवसात चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.

Belgaum Kangral Galli Arrested Robbery belgavkar बेळगाव belgaum

Belgaum Kangral Galli Arrested Robbery

Kangral Galli Arrested Robbery belgavkar

Kangral Galli Arrested Robbery belgaum

बेळगाव : कंग्राळ गल्लीतील एकाला अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm