बेळगाव : नंदगडमध्ये धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास बद्दल मार्गदर्शन;

बेळगाव : नंदगडमध्ये धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास बद्दल मार्गदर्शन;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : नंदगड लक्ष्मी मंदिरामध्ये ( बुधवारी रात्री 8 वाजता) धर्मवीर बलिदान मासबद्दल बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी नंदगड तसेच परिसरातील जवळपास 200 च्या वर युवक उपस्थित होते. बेळगाव शिवप्रतिष्ठान धारकरी आणि बेळगाव जिल्हा गो सेवा प्रमुख हिरामणी मुचंडीकार, उचगाव विभाग प्रमुख मिथिल जाधव, निहाल जाधव हे उपस्थित होते. प्रथम प्रेरणा मंत्राने बैठकीला सुरवात झाली, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं.
धारकरी हिरामणी यांनी अत्यंत कणखर, भावुक आणि मार्मिक भाषेत शिव शंभो महाराजांचा इतिहास, संभाजी महाराजांचं स्वराज्याप्रती आणि हिंदू धर्मप्रती बलिदान आणि त्यांचे औरंगजेबाने कशाप्रकारे अतोनात हाल केले, हे अत्यंत कडव्या भाषेत समजावून सांगितलं. त्यांच्या व्याख्यानात श्रोतावर्ग इतका गुंग झाला होता कि वाटेवरून येणारे जाणारे लोक सुद्धा मंदिरात जागा नव्हती म्हणून खिडकीत उभे राहून ऐकत होते. त्यांच्या व्याख्यानानंतर गणपती पाटील, रोहित गुरव, रत्नाकर नीलजकर आणि मंजू गिरी यांनी विचार मांडले कि आपण बलिदान मास का पळाला पाहिजे, आपलं धर्मकार्य कस असल पाहिजे, हिंदू कशा प्रकारे विभागला गेलाय तो एकत्रित कसा येईल.
या बैठकीला नंदगड ग्राम पंचायत सदस्य यल्लाप्पा गुरव, खानापूर तालुका प्रमुख मनोहर गावडे, नंदगड गाव प्रमुख सतीश धबाले, सह प्रमुख पाटील सर, मंजुनाथ केळवेकर, विकास गुरव, महादेव हलशीकर, विश्वजित चौहान, सागर गुरव आदी उपस्थित होते.
टीप : नंदगड दुर्गामाता दौड मध्ये ठरल्याप्रमाणे यावर्षी जे मोहीम मध्ये सहभागी होतील, बलिदान मास पाळतील त्यांनाच ध्वजाचा मान द्यायचं ठरलं होत. पण या वर्षी मोहीम झाली नाही म्हणून जे धारकरी बलिदान मास पाळतील त्यांनाच ध्वजाचा मान देण्यात येईल आणि बलिदान मासामध्ये रोज सकाळी 7 वाजता लक्ष्मी मंदिरामध्ये प्रार्थना घेण्यात येणार आहे. आणि बलिदान मास हा फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अमावास्या (14 मार्च ते 11 एप्रिल) पर्यंत पाळण्यात येणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : नंदगडमध्ये धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास बद्दल मार्गदर्शन;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm