सोन्याच्या सिंहासनासाठी शनीदेवाला साकडे

सोन्याच्या सिंहासनासाठी शनीदेवाला साकडे

belgavkar.com | belgaum | belgavkar

छत्रपतींच्या सोन्याच्या सिंहासनासाठी भिडे गुरूजी शनिशिंगणापूरला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा म्हणून रायगडावरील 32 मण सोन्याचे सिंहासन लवकर व्हावे, असे साकडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी शनीदेवाला घातले. भिडे गुरुजी यांनी शनिशिंगणापूरला भेट दिली. विश्वस्त समितीचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी त्यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष विकास बानकर, विश्वस्त बाळासाहेब बोरुडे उपस्थित होते. शिवप्रतिष्ठानच्या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा जयघोष केला.
व्याख्यानात भिडे गुरुजी म्हणाले, महाराष्ट्रातील 38 जिल्हे, 394 तालुक्‍यांत छत्रपतींचे कार्य व शिवप्रतिष्ठानचा संकल्प पोचवायचा आहे. नेवासे तालुका संतांची भूमी असून, येथून प्रतिष्ठानला मोठी अपेक्षा आहे. सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागूल यांनी बंदोबस्त ठेवला होता.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे रायगडावर 32 मण सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापित करण्याचा संकल्प श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे करण्यात आला आहे. श्रीरायगडावर पुढील काही काळातच संकल्पित केलेले 32 मण सुवर्ण सिंहासन सर्वांच्या अथक दृढसंकल्पबद्धतेतून साकार होणार आहे. या करीता संपूर्ण महाराष्ट्र सोबतच आपल्या हिंदूस्थानातील अनेक जिल्ह्यातून सर्व धारकरी व शिवभक्त सिंहासनासाठी लागणारा कर्तव्यनिधी संकलनासाठी अथक प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर खडा पहारा नोंदणी करत आहे. श्रीरायगडावर हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम सुवर्ण सिंहासनाच्या पूर्णस्थापनेच्या दुस-या क्षणा पासून खडा पहा-याची आवश्यकता लागणार आहे. प्रत्येक दिवशी एका तालुक्यातील किमान 2000 जण श्रीरायगडावर खडा पहारा देणार आहेत. वर्षभरातील सांगेल त्या एकाच दिवंशी एकाच वेळी स्वतःची भाजी-भाकरी घेऊन तरणी-ताठ वाघाच्या काळजाची पोरं स्वखर्चाने जाऊन पहारा देणार आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

सोन्याच्या सिंहासनासाठी शनीदेवाला साकडे
छत्रपतींच्या सोन्याच्या सिंहासनासाठी भिडे गुरूजी शनिशिंगणापूरला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm