ramesh-jarkiholi-cd-viral-bangalore-video-202103.jpg | बेळगावच्या बड्या नेत्याची आणि मंत्र्यांची अश्लिल सीडी बाहेर....? | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगावच्या बड्या नेत्याची आणि मंत्र्यांची अश्लिल सीडी बाहेर....?

belgavkar.com | belgaum | belgavkar

मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर राजकीय संकट

बंगळुरू - जलसंपदामंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अश्लिल सेक्स व्हिडीओमुळे राज्याच्या राजकारणातील आणखी एका सीडी प्रकरण बाहेर पडले आहे. नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कल्लहळ्ळी यांनी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या रासलीला कर्मकांडाची सीडी बाहेर काढली आहे. मंत्री रमेश जारकीहोळींचे अश्लील दृश्य आणि व्हिडीओ (photos & video) युवतीसोबत असलेले दाखवले आहेत.
ramesh-jarkiholi-cd-viral-bangalore-video-20210302.jpg | बेळगावच्या बड्या नेत्याची आणि मंत्र्यांची अश्लिल सीडी बाहेर....? | belgaum news | belgavkar बेळगावकर
दिनेश कल्लहळ्ळी यांनी पोलिस आयुक्तांकडे मंत्र्यांविरूद्ध चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु आतापर्यंत ही एफआयआर झालेली नाही. यावर भाष्य करताना भाजपच्या आमदार तेजस्विनी गौडा म्हणाल्या की, पक्ष असा गोंधळ सहन करणार नाही. तथापि, याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

नोकरीच्या निमित्ताने रमेश जारकीहोळी यांनी एका युवतीवर अत्याचार केला आहे. तिच्या कुटुंबीयांनी माझ्याशी संपर्क साधून तक्रार नोंदविण्याची विनंती केली होती, अशी माहिती दिनेश कल्लहळ्ळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
Video : https://youtu.be/WSeSC7WvABQ

https://youtu.be/KbEHswVts5U

https://youtu.be/XnsTUEuRGVs
उत्तर कर्नाटकातील रहिवासी असलेली ही युवती बंगळुरूच्या आरटी नगर क्वार्टरमध्ये राहते आणि लघुपट निर्मितीविषयी बोलण्यासाठी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी भेटली. तिने ड्रोन कॅमेर्‍याद्वारे धरणाचे व्हिडीओ काढण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांच्यात अनेकवेळा फोनवर तासनतास बोलणीही होते. तिच्याशी लैंगिक संबंध ठेवत सरकारच्या केपीटीसीएल विद्युत कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखविले जाते. युवतीकडे सेक्स व्हिडिओ असल्याबद्दल मंत्री महोदयांना माहिती मिळते. त्यानंतर त्या युवती आणि तिच्या कुटुंबाला धमकी दिली जाते. हे प्रकरण उघडकीस आणल्यास त्याचा परिणाम योग्य होणार नाही असा इशारा त्याना दिला जातो.
जारकीहोळींना राजीनामा देण्याची सूचना

सीडी प्रकरणावरून सायंकाळी उशिरा राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई हे मुख्यमंत्री बी. एस.येडीयुरप्पा यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अभियान बी. दयानंद ही उपस्थित असल्यामुळे सर्वांची उत्सुकता वाढली आहे. भाजप हाय कमांडने सेक्स सीडीप्रकरणी त्यांना राजीनामा देण्याची सूचना केली आहे. एक केंद्रशासित प्रदेश आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पेचप्रसंगापासून वाचण्यासाठी सीएम बीएस येडीयुरप्पा यांनी लवकरच रमेश जारकीहोळी यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेंगळूर पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी तक्रार दाखल झाली आहे. त्या युवतीच्या तक्रारी नंतर योग्य ती चौकशी करून एफआयआर दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी बुधवारी (3 मार्च) मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.,SEX VIDEO समोर आल्यानंतर पक्षाची बदनामी टाळण्यासाठी जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.