बेळगाव : बजरंग दल कार्यकर्ता रिंकू शर्माच्या हत्येचा निषेध

बेळगाव : बजरंग दल कार्यकर्ता रिंकू शर्माच्या हत्येचा निषेध

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : जय श्रीरामची घोषणा देऊन श्रीराम मंदिरासाठी ऐच्छिक वर्गणी मागितल्याने दिल्लीत रिंकू शर्मा या तरुणाची हत्या करण्यात आली. यामधील नराधमांचा निषेध बेळगावात विश्व हिंदू परिषद - बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांनी केला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांनी रिंकू शर्माची हत्या करणार्‍या नराधमांचा निषेध नोंदविला.
ज्याला रक्त दिलं, त्यानेच रिंकूचं रक्त सांडलं
10 फेब्रुवारीच्या रात्री दिल्लीच्या मंगोलपुरी भागात 25 वर्षीय रिंकू शर्माची हत्या करण्यात आली. रात्री मुलाच्या घरात मारकऱ्यांची गँग घुसली असल्याचा आरोप रिंकूच्या कुटुंबियांनी केला आहे. रिंकूला काठीने मारा, जो कोणी वाचवण्यासाठी येईल त्यालाही मारहाण करा, असं म्हणत रिंकूलाही रस्त्यावर फरफटत ओढले. त्याच्या पाठीत चाकूने वार केले गेले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि जाहिद, महताब, नसीरुद्दीन, तजुद्दीन आणि इस्लाम या पाच आरोपींना अटक केली. वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भांडणाचा परिणाम म्हणून हि हत्या झाल्याचे पोलीस सांगत आहेत. परंतु रिंकूचे कुटुंबीय आणि विश्व हिंदू परिषद वेगवेगळे आरोप करत आहेत.
मृत रिंकू सामाजिक कार्यात भाग घ्यायचा. दरम्यान, रिंकूने आवश्यकतेच्या वेळी हत्येतील मुख्य आरोपींपैकी एक इस्लाम या आरोपीच्या पत्नीला आपले रक्त दिल्याचे उघडकीस आले आहे. त्या आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी यासाठी आज बेळगाव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद सह कोषाध्यक्ष श्री कृष्णाभट्ट, जिल्हा सह कार्यदर्शी आच्यूत कुलकर्णि जिल्हा कार्यदर्शी विजय जाधव, बजरंग दल जिल्हासंयोजक भावकान्ना लोहार, नगर संयोजक आदीनाथ गावडे व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
एका दैनिक वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, हत्या झालेल्या आरोपीची पत्नी गरोदर होती. रिंकूच्या शेजाऱ्याने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. प्रसूतीच्या वेळी तिची तब्येत खालावली, ज्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात रक्त आवश्यक होते. यावेळी रिंकूने आपले रक्त दिले. इतकेच नव्हे तर कोरोनाची लागण झाली तेव्हा रिंकूनेही इस्लामच्या भावाला रुग्णालयात दाखल केले होते. तीन भावांपैकी मोठा असलेला रिंकू हा त्याच्या घरातील एकमेव कमवता सदस्य होता. आजारपणामुळे वडिलांनी नोकरी सोडली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बजरंग दल कार्यकर्ता रिंकू शर्माच्या हत्येचा निषेध

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm