अयोध्देतील श्रीराम मंदिर निर्मितीसाठी 25 लाख रुपयांचा निधी

अयोध्देतील श्रीराम मंदिर निर्मितीसाठी 25 लाख रुपयांचा निधी

belgavkar.com | belgaum | belgavkar

संपुर्ण देशाच्या अस्मीतेचे आणि श्रध्देचे प्रतिक असलेल्या भगवान श्रीराम यांचे भव्य मंदिर राम जन्मभुमि अयोध्या येथे उभारले जात आहे. अयोध्या येथे नियोजित राममंदिर उभारण्यासाठी खाण आणि भूविज्ञान मंत्री मुरुगेश निराणी यांच्याकडून 25 लाखांची मदत देण्यात आली. अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. राज्यातील रामभक्तांकडून मदत केली जात आहे. त्याप्रमाणेच मंत्री मुरुगेश निराणी यांच्याकडून मंदिरासाठी 25 लाखांची देणगी देण्यात आली आहे.
तर हुबळी येथील सेवा भारती ट्रस्टसाठी 5 लाखांची देणगी दिली आहे, अशी माहिती विधानपरषद सदस्य हनुमंत निराणी यांनी कळविली आहे. सदर मदतीचा धनादेश मुरुगेश निराणी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नरेंद्र यांच्याकडे सोपविण्यात आला. मंदिर निर्माण राष्ट्र निर्माणाच्या या पवित्र कार्यासाठी त्यांनी आपल्या वतीने 25 लाख रुपयांचा निधी धनादेशाव्दारे दिला आहे. प्रभू श्री रामाची जन्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र अयोध्या येथे राम मंदिर निर्माण करण्यात येणार असून या श्रीराम मंदिर उभारणीसाठी राम मंदिर निधी विश्व हिंदू परिषद निधी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडे हा धनादेश सुपूर्द केला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

अयोध्देतील श्रीराम मंदिर निर्मितीसाठी 25 लाख रुपयांचा निधी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm