बल्लभगड येथे दिवसाढवळ्या तरुणीवर गोळी झाडली; घटना CCTV त कैद; भाजपा नेत्याकडून Video शेअर करत 'सवाल'

बल्लभगड येथे दिवसाढवळ्या तरुणीवर गोळी झाडली;
घटना CCTV त कैद;
भाजपा नेत्याकडून Video शेअर करत 'सवाल'

belgavkar.com | belgaum | belgavkar

फरिदाबाद - हरयाणा : फरिदाबादमधील वल्लभगड येथे अगरवाल महाविद्यालयाच्या समोर दोन तरुणांनी एका तरुणीची दिवसाढवळ्या गोळी झाडत हत्या केली. या अमानुष हत्येचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध झाले आहे. या प्रकरातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तौफीक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो हरयाणातील मेवातचा रहिवासी आहे, अशी माहिती वल्लभगडच्या पोलिस उपायुक्तांनी माहिती देताना सांगितले आहे. त्याची चौकशी सुरू आहे.
धक्कादाक: दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणीची गोळी झाडून हत्या
या सीसीटीव्ही फूटेजनुसार, अगरवाल महाविद्यालयाच्या समोर एका पांढऱ्या I20 कार मधून दोन तरूण बाहेर आले आणि त्यांनी या दोन तरुणींना अडवले. त्यानंतर त्यांपैकी एका तरुणाशी तरुणीशी बाचाबाची झाली. त्यानंतर त्या तरुणाने त्या तरुणीला बळजबरीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने विरोध केला. त्यानंतर त्या तरुणाने रिव्हॉल्वहस बाहेर काढत थेट तिच्यावर गोळी झाडली. त्यानंतर ती तरुणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. ही धक्कादायक घटना सोमवारी दुपारी 3.30 च्या सुमाराला घडली. निकिता तोमर असे या तरुणीचे नाव असून ती बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. परीक्षा देऊन महाविद्यालयाबाहेर आल्यानंतर तिच्यावर हा हल्ला करण्यात आला.
मृत विद्यार्थिनी बीकॉम अंतिम वर्षाला होती आणि बल्लभगडच्या अग्रवाल महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी आली होती. परीक्षा देऊन ती बाहेर पडली, तेव्हा आय -20 कारमधील एका युवकाने तिला जबरदस्तीने कारमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मुलीने गाडीत बसण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यावर गोळ्या घालून पळ काढला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मृत मुलीचे नाव निकिता आहे. हा खून केल्यानंतर हल्लेखोर कारने पळून गेला. फॉरेन्सिक सायन्स पथकाने घटनास्थावरून पुरावे गोळा केले आहेत. या हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निकात तोमर हिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
निकिताच्या वडिलांनी माहिती दिली की, तौफिक नावाच्या तरुणाने निकितासोबत बारावीपर्यंत शिक्षण घेतले होते. मैत्री करण्यासाठी तो तिच्यावर दबाव आणत होता. मात्र, निकिताने त्याला नकार दिला. आरोपींनी 2018 मध्ये निकिताचे अपहरणही केले होते, मात्र स्थानिकांनी तिची सुटका केली होती. पोलिसांनी विद्यार्थिनीचा भाऊ नवीन याच्या तक्रारीवरून तौफिकविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, भाजप नेत्या प्रीती गांधी यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला असून जर तुम्ही समस्या स्विकारत नसाल तर, त्याचे समाधानच होणार नाही. आज निकिता बळी गेली, उद्या आणखी कोण ? असा सवाल करत लव्ह जिहाद नाकारता येणार नसल्याचं देखील गांधी यांनी म्हटलं आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बल्लभगड येथे दिवसाढवळ्या तरुणीवर गोळी झाडली; घटना CCTV त कैद; भाजपा नेत्याकडून Video शेअर करत 'सवाल'

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm