बेळगाव : 'या' पालिकेवर कत्ती गटाची सत्ता;

बेळगाव : 'या' पालिकेवर कत्ती गटाची सत्ता;

belgavkar.com | belgaum | belgavkar

नगराध्यक्षापदी सिमा हतनूरी तर उपनगराध्यक्ष अजित करजगींची निवड

बेळगाव - संकेश्वर : संकेश्वर पालिकेवर भाजपाचे माजी मंत्री व विद्यमान आमदार उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती गटाची सत्ता स्थापन झाली आहे. या निवडणूकीत काँग्रेसचे माजी मंत्री ए. बी . पाटील गटाचा दारुण पराभव झाला आहे. कत्ती बंधुंनी नगराध्यक्षापदी सौ. सिमा श्रीकांत हतनुरी यांची तर उपनगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार अजित अशोक करजगी यांची सर्व सदस्यांच्या संमतीने निवड केली आहे. नगराध्यक्षापदी सिमा हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी यांना खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार उमेश कत्ती, भाजपाचे 11 सदस्य आणि अपक्ष उमेदवाराचे एक मत अशी एकूण 14 मते मिळाली. तर काँगेसच्या सौ शेवंता कब्बूरी, डॉ जे. एन. करजगी यांना केवळ 11 मते मिळाल्याने त्यांचा पराभव घोषित करण्यात आला. नगराध्यक्षापदी सिमा हतनुरी केवळ तीन मतांनी विजयी झाल्या.
नगराध्यक्षापदी-उपनगराध्यक्ष निवडीची घोषणा होताच हतनुरी-करजगी समर्थकांनी फटाक्यांची आताषबाजी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, शंकरराव हेगडे, राजू संसुध्दी, जयगौडा पाटील, बसवराज बागलकोटी, अभिजित कुरणकर तसेच अनेक मान्यवरांनी नूतन नगराध्यक्षापदी-उपनगराध्यक्ष यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा प्रदान केल्या. पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्ष सिमा हतनुरी म्हणाल्या, पालिकेतील सर्व 23 सदस्यांना बरोबर घेऊन संकेश्वरचा सर्वांगिण विकास साधणार आहे. गावचा विकास हेच आपले लक्ष राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार अशोक गुरानी यांनी काम पाहिले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 'या' पालिकेवर कत्ती गटाची सत्ता;
नगराध्यक्षापदी सिमा हतनूरी तर उपनगराध्यक्ष अजित करजगींची निवड

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm