बेळगाव - सांगली राज्य महामार्गावर अपघात; 1 जागीच ठार, 4 गंभीर जखमी

बेळगाव - सांगली राज्य महामार्गावर अपघात;
1 जागीच ठार, 4 गंभीर जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. कागवाड : कागवाड ते शिरगुप्पी दरम्यान बेळगाव - सांगली राज्य महामार्गावर आयशर टेम्पो आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली होती. त्याच ठिकाणी जीप आणि दुचाकीने देखील एकमेकांना धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर 4 गंभीर जखमी झाले. सोमवारी (26 ऑक्टोबर) मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास कागवाडहून बेळगावकडे जाणाऱ्या एका टेम्पोने ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात परशुराम मारुती पाटील (वय 34, रा. नरवाड तालुका मिरज) या टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला आणि 12 मजुरांपैकी दोघांचा मृत्यू झाला.
ऊस तोडण्यासाठी जाणारे मजूर टेम्पो मध्ये होते. ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रात्रीपासून कागवाड पीएसआय व कर्मचारी घटनास्थळी पोहचून त्यांनी जखमी मजुरांना रुग्णालयात हलवले आहे. ऊस तोडणीच्या हंगामात असे अपघात वारंवार होत असल्याचे स्थानिक तसेच पोलिसांनी सांगितले आहे. जखमींना मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव - सांगली राज्य महामार्गावर अपघात; 1 जागीच ठार, 4 गंभीर जखमी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm