बेळगाव : विषबाधेने 22 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

बेळगाव : विषबाधेने 22 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : उसावर कीटकनाशक औषध फवारणी करण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा विषबाधा झाल्याने मृत्यू झाला. रविवारी (ता. 25 ऑक्टोबर) सायंकाळी बडस खुर्दमध्ये ही घटना घडली. नागराज बाळाप्पा बेटगार ( वय २२, रा. बडस खुर्द ) असे मृताचे नाव आहे.
नागराज रविवारी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या मामाच्या शेतातील उसावर औषध फवारणी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो बादलीतील पाणी प्यायला होता. सायंकाळी सातच्या सुमारास तो घरी परतला. घरी येऊन हातपाय धुवत असताना त्याला अचानक उलट्या सुरु झाल्या. त्यामुळे त्याला तातडीने येळ्ळूर रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : विषबाधेने 22 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm