बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी शंकरगौडा पाटील, तर उपाध्यक्षपदी शिवनगौडा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोसायटी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या गटाने विजय मिळविला आहे. पुढील 5 वर्षे तालुका मार्केटिंग सोसायटीवर पालकमंत्री जारकीहोळी व राजू अंकलगी यांच्या गटाचे वर्चस्व असणार आहे. त्यामुळे निवडणुकीत जारकीहोळी यांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले आहे. मार्केटिंग सोसायटीची निवडणूक झाल्यानंतर अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
मात्र पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राजेंद्र अंकलगी यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी शंकरगौडा पाटील तर उपाध्यक्षपदी शिवनगौडा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीला संचालक असीफ मुल्ला, निंगाप्पा नायक, प्रमोद पाटील, महांतेश अलाबादी, राजेंद्र अंकलगी, विनय कदम, विरुपाक्षी मजगी, सुरेश सावंत, नागरत्ना शिंत्री, लक्ष्मी सोनजी, नंदी उळवप्पा, दिलीप कांबळे, लक्ष्मण नायक आदी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm