देशात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 36,469 कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनानं मानवी शरीरात प्रवेश करण्याचा नवा मार्ग शोधून काढला

देशात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 36,469 कोरोना पॉझिटिव्ह;
कोरोनानं मानवी शरीरात प्रवेश करण्याचा नवा मार्ग शोधून काढला

belgavkar.com | belgaum | belgavkar

Go Corona Goची घोषणा देणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना झाला कोरोना

जगभरात कोरोनाचा कहर सुरूच असून, भारतात मात्र कोरोनाचा वेग मंदावला आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनारुग्ण सक्रिय होण्यात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 79 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 72 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 36 हजार 469 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 488 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 79 लाख 46 हजार 429 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 6 लाख 25 हजार 857 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 19 हजार 502 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 72 लाख 1 हजार 70 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाने जगभरातील सुमारे 200 पेक्षा जास्त देशात हाहाकार माजवला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 4 कोटी 29 लाखांच्या पार गेला आहे. तर सुमारे 11 लाख 53 हजार जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत सुमारे 2 कोटी 90 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
धोका वाढला! कोरोना विषाणूनं शरीरात प्रवेश करण्याचा नवा मार्ग शोधला
देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होत आहे. गेल्या 3 आठवड्यांपासून कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. एकीकडे कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होत असताना आता कोरोनाबद्दलच्या एका संशोधनानं सगळ्यांचीच चिंता वाढवली आहे. कोरोनानं मानवी शरीरात प्रवेश करण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे.
कोरोनाचा विषाणू एका प्रोटीनच्या मदतीनं शरीरात प्रवेश करत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. सायन्स जर्नलमध्ये याबद्दलचा तपशील प्रसिद्ध झाला आहे. कोरोना विषाणूच्या आकार लक्षात घेतल्यास त्याची बाहेरील बाजूंना टोकदार काटे असतात. या काट्यांवर एक विशेष प्रकारचं प्रोटीन असतं. कोरोनाच्या बाहेरील बाजूस असणारं प्रोटीन मानवी शरीरात असलेल्या कोशिकांमधील प्रोटीन एसीई-२ च्या संपर्कात येतात. कोरोना विषाणू मानवी कोशिकांच्या आत शिरतो. त्यानंतर विषाणूंची संख्या वाढते. हळूहळू विषाणू संपूर्ण शरीरात पसरून कब्जा करतो. संशोधकांनी याबद्दल दोन संशोधनं प्रसिद्ध केली. या दरम्यान मानवी कोशिकांमध्ये न्युरोपिलिन-1 नावाचं प्रोटिन आढळून आलं. हे प्रोटीन कोरोना विषाणूला सकारात्मक प्रतिसाद देतं. इंग्लंडमधील ब्रिस्टल विद्यापीठाच्या संशोधकांनी न्युरोपिलिन-1 नावाचं प्रोटीन कोरोना विषाणूला मदत करत असल्याचा शोध लावला आहे.
Go Corona Goची घोषणा देणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना झाला कोरोना
कोरोना व्हायरस विरोधात गो कोरोना, कोरोना गो (Corona Go Go Corona) अशी घोषणा देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale)यांना कोरोनाची लागण (Corona Test) झाल्याची माहिती मिळाली आहे. रामदास आठवले यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून आठवले यांनी विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.


म्हणून घोषणा आठवली... चीनमध्ये कोरोना आला होता, त्यामुळे कोरोना गो ही घोषणा मला आठवली होती, असं रामदास आठवले यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. माझं नाव आठवले असल्याने मला योग्य गोष्टी योग्य वेळी आठवतात, असं मिश्किल उत्तरही त्यांनी दिलं होतं. या घोषणेमुळे माझं नाव आंतराष्ट्रीय पातळीवर पोहचंलं असल्याचं ते म्हणाले होतं. दरम्यान, देशभरात कोरोनाबाधित रुग्णांचा संख्या ओसरली असली तरी काळजी न घेतल्यास कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, अशी भीती केंद्रीय आरोग्य विभागानं वर्तवली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

देशात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 36,469 कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनानं मानवी शरीरात प्रवेश करण्याचा नवा मार्ग शोधून काढला
Go Corona Goची घोषणा देणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना झाला कोरोना

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm