बेळगाव :  बेळगुंदी आणि तपकारवाडीत तरुणांची आत्महत्या

बेळगाव : बेळगुंदी आणि तपकारवाडीत तरुणांची आत्महत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : स्मशानभूमीशेजारील काजूच्या झाडाला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शिवाजीनगर, बेळगुंदी येथे सोमवारी (26 ऑक्टोबर) दुपारी उघडकीस आली आहे. मारुती कल्लाप्पा नाईक (वय 40) असे त्याचे नाव आहे. आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याच्या मागे पत्नी, आई - वडील, तीन मुली, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. घटनेची नोंद वडगाव वडगाव ग्रामीण पोलिसांत झाली आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
तपकारवाडीच्या युवकाची आत्महत्या
तपकारवाडी (ता. चिक्कोडी) येथील एका तरुणाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. भीमू गणपती खोत (वय 31, रा. तपकारवाडी) असे मृताचे नाव आहे. याबद्दल खडकलाट पोलिस स्थानकात फिर्याद दाखल झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भीमू हा मानसिक व शारीरिकदृष्ट्या अशक्त होता. तो घरातून दोन - तीन दिवस वारंवार बाहेर असायचा, तर पुन्हा दोन ते तीन दिवस घरी थांबत होता. मात्र मागील पंधरा दिवस तो घरी परतला नव्हता. याप्रकरणी कुटुंबीयांनी शोध घेतला तरी आढळून आला नव्हता. सोमवारी गावातील एकाच्या शेतामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बेळगुंदी आणि तपकारवाडीत तरुणांची आत्महत्या

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm