बेळगाव : 28 वर्षीय युवकाचा जीव वाचविला; अग्निशामक दलाने इमारतीला लागलेली आग विझवली...

बेळगाव : 28 वर्षीय युवकाचा जीव वाचविला;
अग्निशामक दलाने इमारतीला लागलेली आग विझवली...

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : रविवारी मध्यराञी अगरबत्ती कारखान्याला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शाहूनगर, बी. के. कंग्राळी येथे घडली आहे. रविवारी रात्री 12 च्या सुमारास एका बहुमजली इमारतीत असलेल्या कारखान्याला शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. आग लागली त्यावेळी एक कामगार कारखान्यात झोपला होता. कारखान्यात लागलेली आग व धूर झपाट्याने सर्वत्र पसरल्यामुळे तो कामगार त्यात अडकून पडला होता. त्याच्या आरडाओरडीमुळे आसपासच्या लोकांना आगीची कल्पना आली आणि त्यांनी लागलीच अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली.
इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या स्फूर्ती हर्बल ब्रँडच्या अगरबत्ती तयार करण्याच्या कारखान्याला लागलेली आग विजवण्यात तीन तासानंतर अग्निशामक दलाला यश आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी फायर स्टेशन ऑफिसर व्ही. एस. टक्केकर यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रचंड धुराला तोंड दिला. सुमारे 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. तत्पूर्वी अग्निशामक दलाच्या जवानांनी आत अडकलेल्या पुनीत के. आर. नामक 28 वर्षीय कामगाराला सुखरूप बाहेर काढले.
सदर आग विझवण्यासाठी अधिकारी व्ही. एस. टक्केकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक एफएसओ सी. डी. माने, एलएफ किरण पाटील, व्हाय. जी. कोलकार, एम. एस. मोरे, एफएम आनंद एम. जे., रसूल काकखांडी, संजु वालीकर, शरीफ नदाफ, सी. डी. वारी, श्रीधर बी, बन्शू बूध्धनव्वर या अग्निशामक दलाच्या जवानांनी विशेष परिश्रम घेतले. या घटनेची नोंद एपीएमसी पोलिस ठाण्यात झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 28 वर्षीय युवकाचा जीव वाचविला; अग्निशामक दलाने इमारतीला लागलेली आग विझवली...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm