बेळगाव : कॅटल शेड युनायटेड सांभाळणार

बेळगाव : कॅटल शेड युनायटेड सांभाळणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : स्मार्टसिटी योजनेतून माळमारुतीमध्ये बांधलेल्या कॅटल शेडचे (गोशाळा) हस्तांतरण युनायटेड संस्थेकडे करण्यात आले आहे. याच शेडमध्ये मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली. कॅटल शेड व नसबंदीसंदर्भातची जबाबदारीही आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याकडे देण्यात आली आहे. शहरात मोकाट जनावरांची समस्या गंभीर झाल्यावर कॅटल शेडची चर्चा सुरू झाली. कॅटल शेड बांधल्यावर त्याच्याभोवती संरक्षक भिंत बांधण्यास विलंब झाला.
दरम्यानच्या काळात महापालिकेने कॅटल शेड चालविण्यासाठी ठेकेदार संस्थेचा शोध सुरू केला. गेल्या महिन्यात युनायटेड संस्थेने कॅटल शेड चालविण्याचा ठेका घेतला. तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यावर संस्थेकडून मोकाट जनावरांची देखभाल केली जाईल. सध्या शहरातील मोकाट जनावरे केके कोप्पमधील गोशाळेत पाठविली जातात. पण, गेल्या महिन्यात गोशाळेने मोकाट जनावरे ठेवून घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे महापालिकेने मोकाट जनावरे पकडणे बंद केले होते. पण, गेल्या आठवड्यात ही मोहीम पुन्हा सुरू झाली. कॅटल शेड सुरू होईपर्यंत जनावरे ठेवून घेऊन सहकार्य करण्याची महापालिकेने केलेली विनंती गोशाळा व्यवस्थापनाने मान्य केली. शस्त्रक्रियेसाठी जागा नसल्याने शहरातील मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम बंद आहे.
2007 मध्ये शहरात पहिल्यांदा नसबंदी मोहीम सुरू झाली. तेव्हापासून व्हॅक्सिन डेपोतील एका इमारतीत शस्त्रक्रिया केली जात होती. पण, गेल्या वर्षी रामनगरमधील चेतक संस्थेने नसबंदीचा ठेका घेतल्यावर इमारत शस्त्रक्रियेसाठी योग्य नाही, असे महापालिकेला कळविले. त्याच कारणासाठी 'चेतक'ने मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम थांबविली. त्यामुळे, महापालिकेने पर्यायी इमारतीचा शोध सुरू केला होता. आता कॅटल शेडच्या जागेत इमारत बांधली जाणार असल्याने हा शोधही थांबला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कॅटल शेड युनायटेड सांभाळणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm